गुहागर, ता. 12 : तालुक्यातील पाटपन्हाळे महाविद्यालयात भारत सरकार आणि मुंबई विद्यापीठ यांच्या सूचनानुसार “मेरी माटी मेरा देश” अभियान राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राबवण्यात आले. या अभियानाची सुरुवात २६ जुलै रोजी कारगिल विजय दिनानिमित्त पंचप्राणप्रतिज्ञेने करण्यात आली. हा शुभारंभ सोहळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिंधे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. रासेयो विभाग प्रतिनिधी कु. स्वरांगी नरळकर हिने प्रतिज्ञेचे वाचन केले. “Meri Mati Mera Desh” campaign in Patpanhale College

या अभियानातर्गत दुसऱ्या टप्प्यात दि.९ ऑगस्ट रोजी माजी सैनिक मा. सुनीलजी जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कार्यक्रम अधिकारी डॉ. सनये यांनी उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. भारतीय सैन्यात सेवा बजावलेले मा.सुनीलजी जाधव यांनी गुहागर तालुक्यातून तरुण सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणत भरती होत नाहीत अशी खंत व्यक्त केली. सैन्यामध्ये सेवा करणे याचा आनंद वेगळा असतो प्रत्येकाला ते शक्य झाले नाही तरी आपण युवाशक्ती म्हणून सैनिकी क्षेत्राबरोबरच विविध महत्त्वाच्या पदांवर काम करून देश सेवा करणे यासारखी दुसरी चांगली गोष्ट नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या दृष्टीने आपले ध्येय निश्चित करावे, असे आवाहन मा. सुनीलजी जाधव यांनी केले. “Meri Mati Mera Desh” campaign in Patpanhale College

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षण संस्थेचे सचिव श्री.सुधाकरजी चव्हाण यांच्या हस्ते मा. सुनीलजी जाधव यांचा सत्कार करण्यात आला. सुनील जाधव हे आपल्या संस्थेचे माजी विद्यार्थी असून त्यांचा आदर्श आपल्यासमोर आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी कार्य करावे व संस्थेचा नावलौकिक वाढवावा अशी आशा त्यांनी आपल्या मनोगत व्यक्त केली. आपण सीमारेषेवर जाऊन लढू शकत नाही. अशावेळी सैनिकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून भारताला सुजलाम् सुफलाम् करण्याची व जगात अग्रेसर करण्याची पंचप्राण प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली. याच अभियानांतर्गत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील ६० स्वयंसेवकांनी स्वयं स्फूर्तीने राष्ट्रीय अभियान योगदानासाठी ऑनलाईन नोंदणी केली. “Meri Mati Mera Desh” campaign in Patpanhale College

यावेळी बहुसंख्येने राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सभासद, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व डॉ. प्रविण सनये यांनी केले तर प्रा. प्रमोद देसाई यांनी आभार व्यक्त केले. “Meri Mati Mera Desh” campaign in Patpanhale College
