• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न

by Ganesh Dhanawade
March 27, 2023
in Guhagar
63 0
1
Mentoring camp for teenage girls
123
SHARES
352
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 27 : गुहागर रंगमंदिर येथे किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन शिबिर नुकतेच रंगमंदिर येथे पार पडले. हे शिबिर जिल्हा परिषद, पंचायत समिती सेस अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प गुहागर व गुहागर एज्युकेशन सोसायटीचे श्रीदेव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आले होते. Mentoring camp for teenage girls

Mentoring camp for teenage girls

या शिबिरात किशोरवयीन विद्यार्थिनींना निर्माण होणाऱ्या समस्या व उपाय, मासिक पाळी व त्यामध्ये घ्यावयाची काळजी तसेच आरोग्य व व्यायाम याचे महत्त्व, व्यक्तिमत्व विकास, स्त्री – पुरुष समानता यासारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमासाठी तळवली आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. वाडकर, आरोग्य विभागाच्या विस्तार अधिकारी सौ. सातपुते, परिचारिका सौ. खैरे, एकात्मिक बाल विकास योजना पर्यवेक्षिका सौ. सृष्टी हळये, प्रकल्प अधिकारी श्री. केळसकर, नर्सिंग कॉलेज शृंगारतळी पल्लवी शेटे, गुहागर हायस्कूलच्या सौ. राधा शिंदे यांनी विद्यार्थिनींना किशोर वयात होणारे बदल, या बदलांना कसे सामोरे जावे, व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असलेले शिक्षणाचे महत्त्व, आरोग्य, संतुलित आहार व व्यायाम, मासिक पाळीत घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. Mentoring camp for teenage girls

सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुहागर हायस्कूलच्या सौ. सुजाता कांबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ.समृद्धी कदम व सौ. रेखा भोसले यांनी सहकार्य केले. Mentoring camp for teenage girls

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMentoring camp for teenage girlsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share49SendTweet31
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.