रत्नागिरी जिल्हा रुग्णालय व आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचे सहकार्य
गुहागर, ता. 08 : रत्नागिरी जिल्हा रुग्णालय व आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टतर्फे तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात मानसिक स्वास्थ्य ( आरोग्य ) बाबत कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. रत्नागिरी जिल्हा समुपदेशक संजय रामभाऊ वानखेडे यांनी इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य ( स्वास्थ्य ) बाबत मार्गदर्शन करून परीक्षेत निर्माण होणारा ताण – तणाव, मानसिक संतुलन व भिती याबाबत विद्यार्थ्यांना निर्माण होणाऱ्या शंकांचे निरसन केले. Mental Health Workshop at Patpanhale School


न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य म्हणजे काय, मानसिक आरोग्याचे दृष्टचक्र, मानसिक आरोग्याच्या ताण- तणाव , नैराश्य, भीती व दुभंगलेले मन आदी समस्या तसेच मानसिक आरोग्याबाबत फिरायला जाणे, व्यायाम करणे, ध्यान साधना करणे, योग्य झोप घेणे, भावना व्यक्त करणे, छंद जोपासणे, सदैव सकारात्मकता ठेवणे यासारखे उपाय विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी तणावमुक्त कसे राहावे, ताण- तणाव विरहीत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी मानसिक संतुलन नियमित राखणे गरजेचे आहे. कोणताही ताण – तणाव न घेता मानसिक आरोग्य चांगले राखले पाहिजे असा जीवनोपयोगी सल्ला वानखेडे यांनी दिला. Mental Health Workshop at Patpanhale School
सदरच्या कार्यशाळेसाठी मुख्याध्यापक व्ही. डी. पाटील, शिक्षक आर. एम. तोडकरी, एस. एम. आंबेकर व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. मानसिक आरोग्य कार्यशाळा या आरोग्य विषयक उपक्रमासाठी विद्यार्थ्यांचे सहकार्य चांगले लाभले. Mental Health Workshop at Patpanhale School