प्रत्येक तालुक्यात 1 मेगा वॕट सौर ऊर्जा प्रकल्प उभारू; पालकमंत्री उदय सामंत
गुहागर, ता. 19 : गोळपनंतर वरवेलीमध्ये दुसऱ्या प्रकल्पाचे भूमिपुजन झाले आहे. प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारू, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. ते वरवेली येथील भूमिपुजन कार्यक्रम बोलत होते.यावेळी कोनशिला अनावरण करुन आणि कुदळ मारुन या प्रकल्पाचे भूमिपुजन करण्यात आले. सरपंच, उपसरपंच यांच्यासह प्रकल्पासाठी सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कृषी विकास अधिकारी अजय शेंडे यांनी सर्वांचे आभार मानले. megawatt solar power plant at Varaveli
यावेळी ना. सामंत म्हणाले, 1 मेगा वॕट क्षमतेचा महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प गोळप येथे कालपासून कार्यान्वित झाला. दुसऱ्या प्रकल्पाचे आज भूमिपुजन झाले आहे. हा देखील लवकरच पूर्ण होईल. विकासाचे काम करताना सगळे व्यासपीठावर एकत्र आलो. विकासाची संकल्पना मांडली, त्या लोकप्रतिनिधींना निधी उपलब्ध करुन दिला आहे. तो देणं माझी जबाबदारी आहे. सिंधुरत्न समृध्द योजनेमधून महिला बचत गट, प्रभागसंघाना टुरिस्ट बस देणारा राज्यातला पहिला जिल्हा आहे. अजून 21 बसेस देणार आहोत. पाच पाच कोटींच्या हाऊस बोट देखील मंजूर केल्या आहेत. महिलांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात आले आहे. हे पैसे काढण्यासाठी बँकांनी महिलांना ताटकळत बसवू नये. अन्यथा त्यांच्यावर एफआयआर दाखल केली जाईल, असा इशाराही पालकमंत्र्यांनी यावेळी दिला. megawatt solar power plant at Varaveli
आ. जाधव म्हणाले, 1 मेगा वॕट सौर ऊर्जा प्रकल्पातून 19 लाख युनिट वर्षाला वीज निर्मिती होणार आहे. ही वीज आपल्याच तालुक्यात वापरण्यासाठीच सोय करण्यात आली आहे. ही वीज स्ट्रीट लाईटसाठी वापरली जाणार असल्याने, ग्रामपंचायतींवरील आर्थिक भार कमी होईल. हे पॅनल स्वयंचलित असल्याने सूर्याच्या दिशेने फिरणार आहेत, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाला आ. भास्कर जाधव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे, प्रकाश साळवी, माजी सभापती पुर्वी निमुणकर, माजी जि.प. सदस्य नेत्रा ठाकूर, राहूल पंडित, सरपंच नारायण आगरे आदी उपस्थित होते. megawatt solar power plant at Varaveli फोटो : 18-4 कोनशिला अनावरणसाठी पालकमंत्री उदय सामंत, आ. भास्कर जाधव, विक्रांत जाधव व अन्य.