गुहागर, ता. 04 : कोकण रेल्वे मार्गावरील वीर ते खेड रेल्वे स्थानकादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी ७ जुलै रोजी दुपारी १२.२० वाजल्यापासून ३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे ४ रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. Megablock between Veer to Khed on Konkan route
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कोकण मार्गावर मालमत्ता देखभालीचे काम हाती घेण्यात येत आहे. वीर ते खेड विभागादरम्यान दुपारी १२.२० वाजता सुरू होणारा मेगाब्लॉक दुपारी ३.२० वाजता संपणार आहे. या मेगाब्लॉकमुळे ६ जुलै रोजी सुटणारी २०९१० क्रमांकाची पोरबंदर कोच्युवेली एक्स्प्रेस रोहा-वीर विभागादरम्यान १ तास ५० मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे. तसेच ६ जुलै रोजी सुटणारी १२४३२ क्रमांकाची तिरुअनंतरपुरम-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस रत्नागिरी-खेड विभागादरम्यान ३० मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे. ७ जुलै रोजी सुटणारी १६३४५ क्रमांकाची तिरुअनंतपुरम-लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्स्प्रेसही रोहा-वीर विभागात ३५ मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे. Megablock between Veer to Khed on Konkan route