तब्बल ४ हजार ६२५ जागांसाठी राज्य सरकारने काढले आदेश
मुंबई, ता. 04 : राज्यातील तरूणांचे गेल्या अनके दिवसांपासून लक्ष लागून असलेल्या तलाठी पदाची मेगाभरती राज्य सरकराने अखेर जाहीर केली आहे. राज्यात तब्बल ४ हजार ६२५ जागांची तलाठी पदासाठी मेगाभरती केली जाणार आहे. सरकारने याबाबत आदेश देखील काढले आहेत. १७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर दरम्यान ही मेगाभरती होणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. Mega Recruitment for Talathi Posts in the State

याबाबत महसूल व वन विभागाकडून आदेश काढण्यात आला असून, ज्यात महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४ हजार ६२५ पदांच्या सरळसेवा भरती करता राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यात ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. १७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर दरम्यान ही परीक्षा होणार असल्याचे आदेशात म्हटले आहेत. Mega Recruitment for Talathi Posts in the State

तलाठी भरती प्रक्रिया राज्यस्तरावरुन एकत्रितरित्या राबवली जात असली तरी, सदर तलाठी संवर्गाची यादी तयार करताना त्या-त्या जिल्ह्यात भरावयाच्या पदांचा विचार करुन, प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र निवड यादी तयार करण्यात येऊन, त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र निवड यादी जाहीर केली जाईल. उमेदवारास मिळालेले गुण त्याने अर्ज केलेल्या जिल्ह्याकरताच विचारार्थ घेतले जातील. त्याचा अन्य जिल्ह्यातील निवड यादीशी कोणताही संबंध असणार नाही. तलाठी संवर्गासाठी नियुक्ती प्राधिकारी हे संबंधित उपविभागाचे उपविभागीय अधिकारी असतील, परंतु निवड झालेल्या उमेदवारास उपविभाग नेमून देण्याचे सर्व अधिकार हे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना असतील. Mega Recruitment for Talathi Posts in the State
