• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 October 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

नवरात्रोत्सवासंदर्भात शृंगारतळी येथे प्रतिनिधींची बैठक

by Mayuresh Patnakar
October 8, 2026
in Guhagar
45 1
0
Meeting regarding the Navratri festival
89
SHARES
253
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पोलीस निरीक्षकांकडून कायद्याचे पालन करण्याच्या सूचना

गुहागर, ता. 08 : गणेशोत्सव संपल्यानंतर आता खऱ्या अर्थाने वेध लागले आहेत ते काही दिवसांनी येणाऱ्या नवरात्र उत्सवाचे. दि. ११ आँक्टोबरपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवासंदर्भात पोलीस यंत्रणेकडून शृंगारतळी येथील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बैठक लावण्यात आली होती. यावेळी पोलीस यंत्रणेकडून कायद्याचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले. Meeting regarding the Navratri festival

तालुक्यातील ३५ नवरात्र उत्सव मंडळांना या ठिकाणी बोलवून शासनाने दिलेल्या नियम व अटी यांचे पालन करा असे आदेश दिले आहेत. नवरात्र उत्सवाला कोठेही गालबोट लागता कामा नये, देवीवर असलेले सोन्याचे दागिने सुरक्षित कसे राहतील यासाठी सर्व नागरिकांनी जागरुक रहा, विसर्जन वेळी छोट्या हातगाड्यांचा वापर करावा, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश गुहागर पोलिस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनी सर्व मंडळांना दिले. Meeting regarding the Navratri festival

या सभेला तालुक्याच्या नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष उमेश शिंदे यांनी उपस्थित पोलीस यंत्रणेला सांगितले कि, कोणत्याही मंडळाकडून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी आम्ही घेऊ मात्र दिलेल्या वेळेपेक्षा काही वेळ जास्त झाल्यास त्वरित कारवाई करू नका आम्ही त्या मंडळास समज देवू असे म्हणाले. यावेळी उत्सव मंडळाचे उपाध्यक्ष बापू कोळवणकर, महेश कोळवणकर, पोलीस पाटील विशाल बेलवलकर, दिनेश चव्हाण यांसह तालुक्यातील प्रत्येक मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. Meeting regarding the Navratri festival

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMeeting regarding the Navratri festivalNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share36SendTweet22
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.