गुहागर, ता. 09 : अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ (रजि.) मुंबई यांच्या विनंती नुसार गुहागर तालुका भजनी कलाकारांची भंडारी भवन गुहागर येथे सभा घेण्यात आली. या सभेला गुहागर तालुक्यातून समस्त भजनी श्रेष्ठ, ज्येष्ठ व तरुण भजनी कलाकार कलाकार उपस्थित होते. यांच्या सर्वांच्या अनुमताने भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ गुहागर तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली. Meeting organized by Akhil Bhajan Mandal


त्याचप्रमाणे सदर सभेमध्ये गुहागर तालुक्यातील संपूर्ण भजन मंडळांचा आढावा घेण्यात आला. आपल्या मंडळातील भजनातील प्रत्येक घटकाला त्याचा फायदा व्हावा. सरकारी अनुदान प्राप्त व्हावे त्याचप्रमाणे इतर कलाकारांना सरकारकडून सर्व फायदे मिळतात. तसे आम्हाला मिळावे, यासाठी मार्गदर्शन सभा दि. १५/०६।२०२५ रोजी सकाळी ठिक १०.०० वा. स्थळ भंडारी भवन, गुहागर येथे लावण्यात आली आहे. Meeting organized by Akhil Bhajan Mandal
यावेळी अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ (रजि.) मुंबई मंडळाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार असून भजनी कलाकारांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी गुहागर तालुक्यातील भजन मंडळांनी आपल्या सहका-यांसह उपस्थित रहावे, जेणे करुन त्याचा फायदा आपल्यालाच भवितव्यासाठी होईल, असे आवाहन अध्यक्ष सागर मोरे, सचिव परेश हुमणे यांनी केले आहे. Meeting organized by Akhil Bhajan Mandal