• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भाजपाच्या जेष्ठ कार्यकर्त्यांची शृंगारतळी येथे बैठक

by Mayuresh Patnakar
October 22, 2024
in Politics
257 3
4
Meeting of senior BJP workers

भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते, आजी पदाधिकारी

505
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर विधानसभा मतदारसंघावर कमळ फुलविण्यासाठी भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते सरसावले

गुहागर, ता. 22 : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुक्याच्या जेष्ठ कार्यकर्त्यांची बैठक शृंगारतळी येथे भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत शिरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. Meeting of senior BJP workers

जनसंघापासून काम करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांच्या बळावर उभा राहिलेला भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या गुहागर विधानसभा मतदारसंघाचे २००९ पूर्वीचे गतवैभव पुन्हा एकदा मिळविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. कै डॉ तात्यासाहेब नातू यांच्या छत्राखाली काम करताना तहान भूक विसरून काम करणारा हाडाचा त्यागी कार्यकर्ता म्हणून आमची ओळख असून प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचे कौशल्य आम्हाला अवगत आहे. त्यामुळे १४ वर्षांनी गुहागर विधानसभा मतदारसंघावर आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे माध्यमातून भाजपाचा झेंडा फडकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार यावेळी जेष्ठ कार्यकर्त्यांनी व्यक्त करत जुने आणि नवीन कार्यकर्ते एकमताने एक दिलाने जिद्दीने आत्मविश्वासाने या निवडणूकीच्या रणसंग्रामात उतरले आहेत. यावेळी गुहागर विधानसभा मतदारसंघात जनसंघापासून काम करणारे भाजपचे बुजुर्ग कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. Meeting of senior BJP workers

Tags: BJPGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsMeeting of senior BJP workersNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्याभाजपामराठी बातम्यालोकल न्युज
Share202SendTweet126
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.