रत्नागिरी, ता. 13 : रा भा. शिर्के प्रशालेच्या पटांगणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दक्षिण रत्नागिरीचे रत्नागिरी नगरातील वेगवेगळ्या भागातील एकूण १९ शाखांचे शाखा संमेलन झाले. यामध्ये एकूण ३०० स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. विशेष म्हणजे सर्व वयोगटातील अगदी ८ वर्षापासून ते ८० वर्षापर्यंत सर्व वयोगटातील स्वयंसेवक सहभागी झालेले पाहायला मिळाले. Meeting of Rashtriya Swayamsevak Sangh


शाखेचे काम समाजातील दुर्बल घटकापर्यंत पोहचणे, महिला, शोषित, पीडित वर्गाला सर्वोपरी मदत करणे, समाजात समरसता आणण्याकरता प्रयत्न करणे, प्रत्येक स्वयंसेवक हा आपला बंधू आहे, ही भावना जागृत करणे हे प्रमुख समाज परिवर्तनाचे काम या शाखा संमेलन कार्यक्रमातून प्रत्यक्ष दिसून आले. त्यानंतर प्रांताचे बौद्धिक प्रमुख सुहास पोतदार यांनी बौद्धिक मार्गदर्शन केले. Meeting of Rashtriya Swayamsevak Sangh