१ ऑक्टोबर रोजी स. ११ वा. बाईत विद्यार्थी वसतिगृह खेर्डी, चिपळूण
गुहागर, ता. 25 : सेवा निवृत्त केंद्रप्रमुखांच्या वेतन वाढीबाबत विचारविनिमय करण्यासाठी शनिवार दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. कै. माधवराव बाईत विद्यार्थी वसतिगृह खेर्डी, दत्तमंदिरा जवळ चिपळूण येथे उपस्थित राहावे, असे आवाहन चंद्रकांत मांडवकर यांनी केले आहे. Meeting for Center Heads at Chiplun

सन १९९५ मध्ये पदवीधर शिक्षकांमधून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जिल्ह्यामध्ये २५१ पदवीधर शिक्षकांची केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. १० ते १५ शाळांना मार्गदर्शन करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली होती. केंद्रप्रमुख म्हणून जबाबदारी व कर्तव्याचे पद असल्याने ज्यादा वेतन वाढ अपेक्षित होती. परंतु, केंद्रप्रमुख संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा प्रशासनाला विनंती करण्यात आली होती. मात्र, त्यावर ठोस निर्णय न झाल्याने याबाबत विचारविनिमय करण्यासाठी शनिवार दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. कै. माधवराव बाईत विद्यार्थी वसतिगृह खेर्डी, दत्तमंदिरा जवळ चिपळूण येथे उपस्थित राहावे, असे आवाहन चंद्रकांत मांडवकर यांनी केले आहे. Meeting for Center Heads at Chiplun

प्रशासनाने सेवानिवृत्त केंद्रप्रमुखांना वेतनवाढ देणे बाबत आदेश निर्गमित केला आहे. आता सेवानिवृत्त केंद्रप्रमुखांना याचा लाभ मिळणार आहे. या संदर्भात माहिती पुरविणे अर्ज करणे इत्यादी बाबत चर्चा करण्यासाठी चिपळूण तालुक्यातील सेवानिवृत्त केंद्रप्रमुखांनी या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी केंद्रप्रमुख संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबाजी शिर्के हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. Meeting for Center Heads at Chiplun