रत्नागिरी, ता. 18 : राज्यातील सर्व नागरिकांना परवडणाऱ्या व उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, हे राज्य शासनाचे उद्दिष्ट असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहेत, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले आहे. Medical College in each district

यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत या अर्थसंकल्पातील आरोग्य सुविधांची सविस्तर माहिती दिली आणि ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी अन्न व नागरी ग्राहक संरक्षण विभागाकडून या अर्थसंकल्पात केलेल्या विशेष तरतुदींबाबत देखील माहिती दिली. याशिवाय काल (17 मार्च) विधानसभेमध्ये सन 2023-24 च्या अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यावर सार्वजनिक आरोग्य विभाग, ग्रामविकास विभाग, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागावर चर्चा झाली. यावर ग्राम विकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माहीती दिली. Medical College in each district
मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, राज्यात सुपर स्पेशलिटी रुग्णालये स्थापन करणे आणि त्यांचे श्रेणीवर्धन करणे याबाबतच्या कामांना येणाऱ्या काळात अधिक गती देण्यात येणार आहे. ज्यामुळे आरोग्य व्यवस्था अधिक बळकट होईल. तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहेत. Medical College in each district