वरंडे कुटुंबात एकाच वर्षात ३ एमडीआरटी पुरस्कार
गुहागर, ता. 24 : भारतीय आयुर्विमा महामंडळाचे प्रतिनिधी सौ. स्नेहा संतोष वरंडे यांनी आंतराष्ट्रीय दर्जा प्राप्त करणारे व्यावसायिक ४ थे एमडीआरटी पूर्ण केले. सन 2022/23 सालाकरिता चिपळूण शाखेत सर्व विमेदारांच्या सहकार्याने वरंडे कुटुंबात एकाच वर्षात एकूण ३ एमडीआरटी पुरस्कार मिळाले आहेत. यामुळे सौ. स्नेहा वरंडे यांनाही अमेरिकेला होणाऱ्या कॉन्फरन्ससाठी उपस्थित राहण्याची संधी प्राप्त झाली आहे. MDRT Award to Sneha Varande

सौ. स्नेहा वरंडे या गुहागर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष आहेत. तसेच विविध सामाजिक संस्थांवर सक्रियपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. पती संतोष वरंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विमा क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर कोल्हापूर विभागात अवघ्या वीस दिवसात प्रथम एमडीआरटी होण्याचा बहुमान त्यांनी प्राप्त केला होता. सतत अधिकाधिक लोकांना भेटून उत्तम सेवा देताना विमा संरक्षणही वाढवून देण्यात यशस्वी झाल्याने त्यांना 2022/23 या वर्षातील एमडीआरटी बहुमान मिळवणे शक्य झाले. MDRT Award to Sneha Varande

यासाठी मेहनत तर आहेच पण सर्व विमेदारांचे प्रेम आणि अखंड पाठिशी असलेला आशिर्वाद यामुळे प्रचंड ऊर्जा मिळून यश मिळवणे सोफे झाले. या यशात आमचे कुटुंब, वरंडे विमा सेवा सर्व सहकारी, चिपळूण ब्रांचचे मॅनेजर श्री. साईनाथ मेस्त्री आणि सर्व अधिकारी व कर्मचारी, विकास अधिकारी श्री. शशिधर कान्हेरे, एजंट होमचे सर्व सहकारी यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. MDRT Award to Sneha Varande

