• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
10 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विमा प्रतिनिधी संतोष वरंडे यांना 12 वे एमडीआरटी बहुमान

by Ganesh Dhanawade
July 5, 2023
in Guhagar
110 2
0
MDRT Award to Santosh Varande
217
SHARES
620
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सातत्यपूर्ण कामगिरी, उत्कृष्ट कमिशनसह अर्धशतक वीर आणि अर्ध करोडपती मानांकन

गुहागर, ता. 05 : येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) शाखा गुहागर मधील अग्रणी विमा प्रतिनिधी संतोष वरंडे यांनी सन 2024 या सालातील एमडीआरटी होण्याचा मान प्राप्त केला आहे. अमेरिकेत होणाऱ्या एमडीआरटी कॉन्स्फरन्ससाठी ते पात्र ठरले आहेत. MDRT Award to Santosh Varande

विमा प्रतिनिधी संतोष वरंडे हे गुहागर वासियांना उत्तम आयुर्विमा सेवा देण्याचे काम गेली अनेक वर्षे करत आहेत. सुसज्ज कार्यालय, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, सेवा आणि तत्परता या त्यांच्या गुणांमुळे ते त्यांच्या विमेदारांच्या विश्वासाला नेहमीच पात्र ठरत आले आहेत. तसेच विविध सामाजिक कार्यात अग्रेसर राहून त्यांच्या पत्नी सौ. स्नेहा वरंडे, मुलगा ओंकार वरंडे हेही गेले अनेक वर्ष एजंट म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी पत्नी स्नेहा वरंडे यांनी चार वेळा एमडीआरटी पुरस्कार प्राप्त केला आहे. तर संतोष वरंडे यांनी 12 वेळा हा सन्मान प्राप्त केला आहे. MDRT Award to Santosh Varande

या पुरस्काराबद्दल बोलताना श्री. वरंडे म्हणाले, या एमडीआरटीसाठी मेहनत तर आहेच, पण तुमचे सर्वांचे प्रेम आणि अखंड पाठिशी असलेला आशिर्वाद यामुळे प्रचंड ऊर्जा मिळाली. या यशात माझे कुटुंब, वरंडे विमा सेवा सर्व सहकारी, चिपळूण ब्रांचचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच माझे विकास अधिकारी शशिधर कान्हेरे, एजंट होमचे सर्व सहकारी यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच माझा प्रिय विमेदार आणि माझा हितचिंतक, मित्र परिवार यांच्या मुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. म्हणूनच त्यांचे आभार न मानता मी अखंड त्याचा ऋणी राहीन, असे त्यांनी सांगितले. MDRT Award to Santosh Varande

Tags: General meeting of Kunbi Samojonnati Sangh concludedGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share87SendTweet54
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.