• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दापोली कृषी विद्यापीठ अंतर्गत “मयुरपंख २०२३”

by Guhagar News
September 16, 2023
in Ratnagiri
61 1
0
"Mayur Pankh 2023" under Dapoli Agricultural University
120
SHARES
342
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सवात शरदचंद्रजी पवार  कृषी महाविद्यालयाचे यश

संदेश कदम, आबलोली
रत्नागिरी, ता. 16 : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव “मयुरपंख २०२३” चे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम दि.०९ ते ११ सप्टेंबर २०२३ या कालावधीत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे सिंधुदुर्ग येथे संपन्न झाला. या सांस्कृतिक स्पर्धेमध्ये एकूण २५ महाविद्यालयातील सुमारे ४५० स्पर्धक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये शरदचंद्रजी पवार कृषी व कृषी सलग्न महाविद्यालय, खरवते-दहिवली या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले. “Mayur Pankh 2023” under Dapoli Agricultural University

"Mayur Pankh 2023" under Dapoli Agricultural University

या स्पर्धेमध्ये शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाचे संगीत विभागातील शास्त्रीय वादन (तालवाद्य) मध्ये कु.ओंकार पाटील, उपविजेता, स्वर वाद्य मध्ये कु.स्वयंभू मेस्त्री, उपविजेता, भारतीय समूह गायन मध्ये उपविजेता, साहित्य विभाग मध्ये वक्तृत्व कला प्रकारामध्ये कु.दिप्ती वळंजू, उपविजेता, सांस्कृतिक मिरवणूक या कला प्रकारामध्ये उपविजेता, तर शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालयाचे नृत्य विभाग मध्ये भारतीय लोकनृत्य मध्ये, उपविजेता, नाट्य विभाग मध्ये एकांकिका मध्ये उपविजेता, प्रहसन कला प्रकारामध्ये उपविजेता, ललित विभाग- माती काम या कला प्रकारामध्ये कु.दिया मोरे, उपविजेता, नृत्य विभाग – उपविजेता, नाट्य विभाग – उपविजेता यांनी यश संपादन केले आहे. “Mayur Pankh 2023” under Dapoli Agricultural University

या स्पर्धेचे उदघाटन दि.०९ सप्टें. रोजी पद्मश्री विजेते श्री.परशुराम गंगावणे, डॉ.हळदवणेकर पी.सी. कुलसचिव, डॉ.बा.सा.को.कृ.विद्यापीठ, दापोली, डॉ.सावंत पी.ए. संचालक, विस्तार शिक्षण, डॉ.बा.सा.को.कृ.वि., दापोली व सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय, दापोली यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. तसेच स्पर्धेचे बक्षीस वितरण दि.११ सप्टें.रोजी सुप्रसिद्ध मराठी बाल कलाकार कु.रुची नेरूरकर, डॉ.नाईक व्ही.जी.संचालक, क्रीडा व सहशैक्षणिक उपक्रम,डॉ.बा.सा.को.कृ.वि., डॉ.शिरसाठ एन्.ए., सांस्कृतिक समन्वयक, डॉ.बा.सा.को.कृ.वि., डॉ.आर्.जी. खांडेकर, सह.अधि.,उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे, श्री.वागळे एन.ए., विद्यार्थी कल्याण अधिकारी, डॉ.बा.सा.को.कृ.वि. यांचे उपस्थितीत पार पडला. “Mayur Pankh 2023” under Dapoli Agricultural University

"Mayur Pankh 2023" under Dapoli Agricultural University

या स्पर्धेच्या यशाबद्दल आमदार श्री.शेखर निकम, कार्याध्यक्ष, सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे, व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनीतकुमार पाटील यांनी विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. या स्पर्धेसाठी प्रा.साळवी व्ही. एम.,प्रा.कदम एस.एम.,प्रा. पाटील ए.आर.,प्रा.जाधव ए.डी. यांनी संघ व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. “Mayur Pankh 2023” under Dapoli Agricultural University

Tags: "Mayur Pankh 2023" under Dapoli Agricultural UniversityGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMayur Pankh 2023News in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामयुरपंख २०२३मराठी बातम्यालोकल न्युज
Share48SendTweet30
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.