• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 October 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंचचे पुरस्कार जाहीर

by Guhagar News
December 5, 2023
in Ratnagiri
96 1
4
Matoshree Lakshmibai Kadam Memorial Forum Award Announced
188
SHARES
537
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संदेश कदम, आबलोली
रत्नागिरी, ता. 05 : जिल्ह्यातील कार्यरत असलेली मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत (ता.चिपळूण) या कौटुंबिक सेवाभावी संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या विधवा प्रथा बंदच्या ठरावानुसार अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायती, महिला बचत गट, महिला मंडळ, सामाजिक संस्था आणि समाजसेवकांना स्त्रीमुक्ती स्वातंत्र्याचे क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयडॉल ऑफ रत्नागिरी सन्मान २०२३ नुकताच संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजयराव शांताराम कदम यांनी जाहीर केला आहे. Matoshree Lakshmibai Kadam Memorial Forum Award Announced

सदर पुरस्कार प्रदान सोहळा रविवार दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी ‌ सकाळी १०:३० वाजता डॉ.  बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन, प्रांत कार्यालयाजवळ, चिपळूण येथे नामवंत मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. असे संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजयराव शांताराम कदम यांच्या वतीने कु संघराज कदम ( ९५११२७३३५५) यांनी कळवीले  आहे. Matoshree Lakshmibai Kadam Memorial Forum Award Announced

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने आणि राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षाचे औचित्य साधून स्त्रीमुक्ती स्वातंत्र्याचे क्रांतिसूर्य डॉ‌. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या स्मृती प्रित्यर्थ सन २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने कृतिशील कार्यवाहीच्या माध्यमातून जनजागृती परत्वे गेली २८ वर्ष सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आरोग्य, साहित्य, पत्रकारिता, पर्यावरण व एड्स या क्षेत्रात कार्यरत असलेली रत्नागिरी जिल्ह्यातील मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत या कौटुंबिक सेवाभावी संस्थेच्या वतीने ज्या ग्रामपंचायती मार्फत अनिष्ट विधवा प्रथा बंदच्या आदेशाची अंमलबजावणी करून विधवा महिलांच्या सन्मानाकरिता सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक उपक्रम राबविले आहेत. अशा ग्रामपंचायती समवेत विधवा महिलां बचत गटांना, महिला मंडळाना, सामाजिक संस्था आणि समाज सेवाकांना स्त्रीमुक्ती स्वातंत्र्याचे क्रांतीसुर्य डॉ .बाबासाहेब आंबेडकर  आयडॉल ऑफ रत्नागिरी सन्मान २०२३ संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजयराव शांताराम कदम यांनी जाहीर केला आहे. Matoshree Lakshmibai Kadam Memorial Forum Award Announced

समाजातील विधवा महिलांना विविध सामाजिक, धार्मिक,कौटुंबिक कार्यक्रमात मानसन्मान मिळावा. त्यांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त व्हावी किंवा प्रत्यक्ष कृतीतून नवा आदर्श निर्माण व्हावा या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतीनी या अनिष्ट विधवा प्रथेला मूठ माती देऊन अशा महिलांचा सन्मान केला आहे किंवा विधवा महिलांकरिता सामाजिक कार्य करणाऱ्या पूर्णत: योगदान देणाऱ्या सामाजिक संस्था, महिला बचत गट, महिला मंडळ ,सामाजिक संस्था आणि ज्येष्ठ श्रेष्ठ समाजसेवकांना आधुनिक क्रांतीपर्वातील स्त्रीमुक्ती स्वातंत्र्याचे क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयडॉल ऑफ रत्नागिरी सन्मान -२०२३ सन्मानार्थ पुरस्कार प्राप्त झालेले पुरस्कर्ते खालील प्रमाणे. Matoshree Lakshmibai Kadam Memorial Forum Award Announced

सन्मानित ग्रामपंचायत व सरपंच

ग्रामपंचायत नाणीज (रत्नागिरी) सरपंच, गौरव संसारे, ग्राम. मुरादपूर(संगमेश्वर) सरपंच, मंगेश वांडागळे, ग्राम. उमराठ (गुहागर) सरपंच, जनार्दन आंबेकर, ग्राम. आबलोली (गुहागर)सरपंच सौ.वैष्णवी वैभव नेटके, ग्राम.  भिले (चिपळूण) सरपंच, सौ.आदिती गुडेकर,  ग्राम. तेरेवायंगणी (दापोली) सरपंच, मनोहर करबेले, ग्राम. पानवल (रत्नागिरी) सरपंच तनिष्का होरंबे, ग्राम. भडकंबा (रत्नागिरी) सरपंच, बापू शिंदे, ग्राम.  वरवेली (गुहागर) सरपंच नारायण आंग्रे,  ग्राम. पाचाड (चिपळूण) सरपंच नरेश धोरणे, ग्राम. नारडुवे (संगमेश्वर) सरपंच कृष्णा के जोगले. Matoshree Lakshmibai Kadam Memorial Forum Award Announced

सन्मानित सामाजिक संस्था

कुणबी समाजसेवा संघ,नाचणे (रत्नागिरी) सरचिटणीस विकास पेजे
पल्लवी प्रतिष्ठान, पन्हळे (राजापूर) संस्थापक उमेश शिगवण
अक्षरमित्र जुवाठी (राजापूर) संस्थापक बी.के. गोंडाळ सर, 

सन्मानित महिला बचत गट

आनंदी महिला बचत गट पाचाड (चिपळूण) अध्यक्षा

सन्मानित जेष्ठ श्रेष्ठ समाजसेवक

कोकणचे गाडगेबाबा प्रबोधनकार मारुती काका जोयशी मु.साखरपा (संगमेश्वर)

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMatoshree Lakshmibai Kadam Memorial Forum Award AnnouncedNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share75SendTweet47
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.