१ ऑक्टोबरला लांजा, देवरुखमध्येही आयोजन
रत्नागिरी, ता. 30 : शिक्षक दिनाच्या औचित्याने इन्फिगो आय केयर हॉस्पिटलच्या (Infigo Eye Care Hospital ) वतीने शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांकरिता गणित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दि ३० सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ४.३० या वेळेत माळनाका येथील रा. भा. शिर्के प्रशालेत घेतले जाणार आहे. १ ऑक्टोबरला स्पर्धा परीक्षांकरीता तयारी व प्रशिक्षण कार्यशाळा देवरूख आणि लांजा येथे आयोजित केली आहे. यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून गणित तज्ञ प्रा. महेंद्र करकरे मार्गदर्शन करणार आहेत. Math Workshop by Infigo Hospital

ही कार्यशाळा मोफत खुली असून रा. भा. शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिरात कार्यशाळा होईल. लांजा येथील एसटी डेपोसमोरील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात गणित कार्यशाळा 1 ऑक्टोबरला रोजी दुपारी 2 ते सायं 4.30 यावेळेत होईल. 1 ऑक्टोबरला सकाळी 10 ते दु.12.30 या वेळेत देवरूख येथील माटे- भोजने हॉल येथे ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेला शाळा व महाविद्यालय येथे गणित विषय शिकविणारे शिक्षक आणि प्राध्यापक व पालक आणि विद्यार्थी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन इन्फिगो आय केअर हॉस्पीटलतर्फे करण्यात आले आहे. Math Workshop by Infigo Hospital

इयत्ता पाचवी ते बारावी व महाविद्यालयीन वर्गांना गणित अध्यापन करणारे सर्व शिक्षक विद्यार्थी व पालक यांच्यासाठी ही कार्यशाळा महत्वाची आहे. शाळेपासून महाविद्यालयापर्यंत गणित व विज्ञान हे दोन्ही विषय न समजल्याने अनेक विद्यार्थी स्कॉलरशिप पासून दहावी बारावी व त्यापुढील स्पर्धा परीक्षांमध्ये मागे पडतात. नेमका याच गोष्टीचा विचार करून गणित या विषयाची अत्यंत सोप्या पद्धतीने कशी समज यावी. व हा विषय हाताळण्यासाठी विद्यार्थी पालक व शिक्षक या तिघांनाही एक नवा दृष्टिकोन व आत्मविश्वास मिळावा, या हेतूने मुंबई येथील प्रख्यात गणितज्ञ व स्पर्धा परीक्षा या विषयातील नामवंत तज्ञ महेंद्र करकरे यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी सांगितले. Math Workshop by Infigo Hospital
