• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दिल्ली येथील गूंज संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

by Ganesh Dhanawade
December 12, 2022
in Ratnagiri
119 1
3
Material distribution by Goonj Sanstha

गूंज या सामाजिक संस्थेतर्फे शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना

233
SHARES
667
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 12 : देशातील 32 राज्यांतील अनेक जिल्ह्यांमध्ये दिल्ली येथील गूंज ही सामाजिक संस्था कार्यरत आहे. या सामाजिक संस्थेतर्फे गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा कुडली नं. ३ माटलवाडी शाळेत विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप नुकतेच करण्यात आले. Material distribution by Goonj Sanstha

यावेळी संस्थेचे प्रमुख अंशू गुप्ता यांच्या संकल्पनेतून देशातील प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी प्रत्येक सक्षम व्यक्तीने मदतीचा हात पुढे केला पाहिजे, ही भावना त्यांनी बोलून दाखवली. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांकडून विविध कृती त्यांनी करून घेतल्या. तसेच शाळेच्या भौतिक गरजांच्या पूर्ततेसाठी यापुढे संस्थेच्या माध्यमातून वेळोवेळी सहकार्य करू, असे आश्वासन दिले. Material distribution by Goonj Sanstha

https://ayurzeal.com/
https://ayurzeal.com/मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुहास गायकवाड यांनी संस्थेचे सदस्य प्रथमेश नाटुस्कर  तसेच त्यांच्या समवेत उपस्थित गावातील पदाधिकारी दिनेश माटल, मधुकर माटल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश वनये, मुकेश थोरसे, विजय घडशी, रवींद्र ठोंबरे, जितेंद्र ठोंबरे, संजय माटल यांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर संस्थेचे सदस्य प्रथमेश नाटुस्कर यांनी गूंज या दिल्ली येथील सामाजिक संस्थेचे देशांमध्ये जे विविध सामाजिक, शैक्षणिक व कृषी विषयक तसेच जलसंधारण विषयक उपक्रम चालू आहेत त्याची माहिती दिली. Material distribution by Goonj Sanstha

या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपासाठी सहाय्य करणारे गावचे नागरिक सामाजिक कार्यकर्ते दिनेश माटल यांचे व उपस्थित सर्वांचे आभार शाळेतील उपशिक्षक श्री. संदेश सावंत यांनी मानले. यावेळी शाळेतील पदवीधर शिक्षिका सौ. प्रमोदिनी गायकवाड, उपशिक्षक गणेश वायचाळ उपस्थित होते. Material distribution by Goonj Sanstha

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMaterial distribution by Goonj SansthaNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share93SendTweet58
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.