• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 March 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चित्रकला स्पर्धेत कुडली माटलवाडी शाळेचे सुयश

by Ganesh Dhanawade
February 16, 2023
in Guhagar
103 1
0
Matalwadi School's success in painting competition

चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करताना पोलीस उप निरीक्षक पवनकुमार कांबळे.

202
SHARES
577
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 16 : तालुक्यातील दिवंगत शिवराम पांडुरंग जाधव वाचनालय कुडली यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कुडली गावस्तरीय बाल चित्रकला स्पर्धेत माटलवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले. Matalwadi School’s success in painting competition

मुंबई स्थित कुडली गावचे ग्रामस्थ आनंद शिवराम जाधव यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत छोट्या गटात प्रथम क्रमांक आरोषी अरुण थोरसे, द्वितीय क्रमांक सृष्टी योगेश निवाते, तृतीय क्रमांक सार्थकी प्रदीप माटल तर मोठ्या गटात प्रथम क्रमांक वैदेही रवींद्र ठोंबरे, द्वितीय क्रमांक आर्यन जानू माटल, तृतीय क्रमांक अनुष्का विश्वास थोरसे व उत्तेजनार्थ साधना महादेव माटल या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले. Matalwadi School’s success in painting competition

ग्रामपंचायत कुडलीच्या सरपंच चैतनी शेट्ये, गुहागर पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे, शिक्षण विस्तार अधिकारी गणपत पांचाळ, कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अस्मिता दिघे, शाळा व्यवस्थापन समिती कुडली नंबर ४ अध्यक्षा रेखा जाधव, ग्रामपंचायत सदस्या निकिता जाधव यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. Matalwadi School’s success in painting competition

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

यावेळी उपस्थित गुहागर पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे यांनी आपल्या जिल्हा परिषद शाळेतील बालपणीचे अनुभव सांगताना विद्यार्थ्यांमध्ये विविध स्पर्धांविषयी प्रेरणा निर्माण केली. शिक्षण विस्तार अधिकारी गणपत पांचाळ यांनीही आपण शेजारील गावचे सुपुत्र असल्याचे व आपण शिक्षणामुळे इथपर्यंत कसे पोहोचलो हे विद्यार्थ्यांना सांगितले. Matalwadi School’s success in painting competition

यावेळी कुडली शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद साळवी, सुहास गायकवाड प्रदीप राठोड माधवी पाटील, शिक्षिका प्रमोदिनी गायकवाड, संदेश सावंत, गणेश वायचाळ, अशोक मलमे, हिरामण डुकरे, अजित पाटील इत्यादी शिक्षक व परिसरातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. गावामध्ये विद्यार्थ्यांसाठी अत्यंत स्तुत्य उपक्रम प्रतिवर्षी राबवित असल्याबद्दल सरपंच चैतनी शेट्ये यांनी आनंद शिवराम जाधव यांना गावाच्या वतीने धन्यवाद दिले. Matalwadi School’s success in painting competition

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMatalwadi School's success in painting competitionNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share81SendTweet51
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.