गुहागर, ता. 25 : समग्र शिक्षणाअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण १००१ प्राथमिक शाळेंमध्ये विद्यार्थिनींना राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कार्यक्रमाअंतर्गत स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. हा कार्यक्रम Skill Tree Consulting Pvt. Ltd. यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय खेळाडू डॉ. योगिता खाडे यांच्या नेतृत्वाने होणार आहे. यामध्ये मुलींना मार्शल आर्ट प्रशिक्षकांकडून 37 Session मध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. Marshal Arts Lessons for Self -defense for Students

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास प्रगारे यांनी सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिकांच्या आयुक्तांना दिलेल्या निर्देशानुसार स्वसंरक्षण प्रशिक्षणाद्वारे मुलींना मानसिक बौध्दिक आणि शारिरीक दृष्ट्या पूरेसे संक्षम करण्याची गरज आहे. जेणे करून त्या संकटाच्या आणि असूरक्षतितेच्या वेळी स्वतः संरक्षण करू शकतील, यासाठी रत्नागिरी जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक वामन जगदाळे, जिल्हा परिषद रत्नागिरी, उपशिक्षण अधिकारी संदेश पडव, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रविंद्र कांबळे, जि.प.रत्नागिरी, जि. समन्वयक प्रविण जहांगिरदार यांनी त्वरीत जि. गटशिक्षण अधिकारी, सर्व पंचायत समिती प्रशासन अधिकारी, नगरपरिषद शिक्षण मंडळ, गटविकास अधिकारी, केंद्र प्रमुख, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळेंना आदेश दिले. त्या प्रमाणे डॉ. योगिता खाडे, त्यांचे प्रशिक्षक आणि तालुका समन्वयक गुहागर- हुजैफा ठाकूर, प्रणित सावंत, चिपळूण – विनोद राऊत व शशिकांत उदेग, लांजा – तेजस पावसकर व तेजस्वीनी आचरेकर, रत्नागिरी स्वप्नाली पवार, जावेद मिरकर, राजापूर – मुकेश नाचरे, मंडणगड विश्वदास लोखंडे, संगमेश्वर शशांक घडशी तसेच दापोली व खेड या – तालुक्यात सिनियर कॉलेज विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांचे स्पेशल प्रशिक्षण होत आहे. प्रशिक्षक दुर्गम भागात जावून काम करत आहेत. Marshal Arts Lessons for Self -defense for Students

हे अभियान पूर्णत्वास जाण्यासाठी वेगवेगळ्या कॉलेजचे अनेक संस्थेचे खेळाडू आणि प्रशिक्षक खेडोपाडी जावून शिकवत असून यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. यासाठी सर्व तालुका गट शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व पालक, पंचायत समिती, समाज सेवक यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. Marshal Arts Lessons for Self -defense for Students

