गुहागर, ता.16 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर शाळेच्या वतीने व लोकसहभागातून उस्फूर्तपणे जनजागृती सागरी महा रॅलीचे आयोजन करण्यात आले. लोकसहभागातून यापूर्वी शाळेची राज्यस्तरीय शिक्षण वारीमध्ये वर्धा, नांदेड, जळगाव, मुंबई व कोल्हापूर या पाच ठिकाणी निवड झाली आहे. Marine Rally at Veldur Nawanagar

रत्नागिरी जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जनजागृती करण्याच्या उद्देशाने मुख्याध्यापक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून सदर रॅलीचे आयोजन करण्यात आले. वेलदूर नवानगर शाळेमध्ये ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रभक्तीपर गीते गाण्यात आली. सदर रॅली श्रीराम मंदिर विठ्ठल मंदिर मोहल्ला वनकरवाडी मार्गे नवानगर बंदर येथे काढण्यात आली. दाभोळ खाडी किनारी असलेल्या मच्छीमार समाजामध्ये जनजागृती व्हावी म्हणून वेलदूर दाभोळ ओणी भाटी धोपावे तरीबंद आदी किनारी वस्तीतून जोरदार जनजागृती करण्यात आली. Marine Rally at Veldur Nawanagar

त्यावेळी ग्रामविकास अधिकारी आर बी कुळे साहेब, शिक्षण तज्ञ शंकर कोळथरंकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सानिया वनकर, आरोग्य सेवक, राजलक्ष्मी बोटीचे मालक केतन वनकर, मच्छीमार नेते संदीप वनकर, कलावंत विठोबा दाभोळकर, मोहल्याचे नेते सलीम सरनोबत महालदार, अरविंद भोसले तांडेल, उमेश नाटेकर तांडेल, विघ्नेश जांभारकर , अनिकेत वनकर , रुपेश हरचकर, सुहास आंबेरकर, अजिंक्य आंबेरकर, सत्यजित तीमसेकर, तुकाराम कोळथरकर, संजय भोसले, समीर वनकर, प्रशांत वनकर, रतेश्वर जांभारकर, कुमार आंबेरकर, गोपाळ रोहीलकर, सुहानी नाटेकर, मत्स्यगंधा कोळथरकर, सोनिया नाटेकर, सुरक्षा रोहीलकर, वैष्णवी कदम, गीता वरवटकर, संचिता पालशेतकर, ऋतुजा रोहीलकर, सत्वशीला जगदाळे, पल्लवी घुले, अंजली मुद्दमवार, निलोफर शेख, विशाखा नाटेकर, सुवर्णा कोलथरकर यासह मच्छिमार बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.राजलक्ष्मी बोटीचे मालक केतन वनकर यांच्या सहकार्यामुळेच ही रॅली यशस्वी होऊ शकली. या रॅलीचे नवानगर गावामध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. Marine Rally at Veldur Nawanagar

हर घर तिरंगा या जनजागृती रॅलीला गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, गटशिक्षणाधिकारी लीना भागवत, ग्राम विकास अधिकारी आर बी कुळे व मुख्याध्यापक मनोज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सदर रॅलीला मच्छीमार बांधव, महिला मंडळ, शिक्षक पालक संघ यांचे सहकार्य लाभले. सदर रॅलीमुळे गावामध्ये नवचैतन्याचे वातावरण पसरले. Marine Rally at Veldur Nawanagar

