• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सागरी महामार्गाच्या रस्त्याचे होणार पुनरसर्वेक्षण

by Ganesh Dhanawade
July 30, 2024
in Guhagar
433 5
13
Marine highway will be re-surveyed

बांधकाम मंत्री रवीद्र चव्हाण यांच्यासोबत चर्चा करताना माजी आमदार डॉ. विनय नातू आणि भाजपचे पदाधिकारी

851
SHARES
2.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

डॉ. नातूनी लावलेल्या बैठकीत बांधकाम मंत्र्यांनी दिले अधिकाऱ्यांना आदेश

गुहागर, ता. 30 : माजी आमदार डॉ. विनय नातू  यांनी सागरी महामार्गाच्या गुहागर तालुक्यातील रस्त्याचे पुनर् सर्वेक्षण होण्याकरता मंत्रालयात बैठक लावण्याची बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे  केली होती. त्यानुसार लावलेल्या बैठकीत गुहागर तालुक्यातील सागरी महामार्गाच्या रस्त्याचे पुनर् सर्वेक्षण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग 166 ई गुहागर – विजापूर या महामार्गाच्या प्रलंबित कामकाजाला येत्या दीड महिन्यात गती देण्याच्या सुचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मंत्री ना. चव्हाण यांनी दिल्या आहेत. Marine highway will be re-surveyed

गुहागर तालुक्यामध्ये सागरी महामार्ग जात असताना गुहागर शहराच्या निवासी भागातून हा महामार्ग जात आहे. त्याऐवजी गुहागर शहरातील गुहागर हद्दीच्या पूर्व बाजूकडे जाऊन गुहागर मधील वाकी पिंपळवट गावातून गुहागर शासकीय विश्राम धाम, न्यायालय यांच्या जवळ हा महामार्ग गुहागर – विजापूर राष्ट्रीय महामार्गाला मिळाल्यास अत्यंत चांगल्या पद्धतीचा महामार्ग होईल असे सूचित केले होते. यामुळे अंतर कमी होईल, भूसंपादनाचे पैसे कमी होतील आणि गुहागर शहरांमधील निवासी वस्तीचे स्थलांतर होणार नाही. निवासी वस्तीला या रस्त्याचा उपयोग होईल. विशेष करून पर्यटनांमध्ये वाढ होईल अशा पद्धतीने या रस्त्याचा आराखडा करण्याकरता संबंधित अधिकाऱ्यांसमवेत ही बैठक आयोजित करावी अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली होती. Marine highway will be re-surveyed

त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 ई गुहागर – विजापूर या महामार्गाच्या कामकाजाबद्दल अनेक विषय प्रलंबित आहेत. या यामध्ये शृंगारतळी तालुका गुहागर या गावांमधील गटारांचे अपूर्ण बांधकाम, गुहागर शहरातील शून्य किलोमीटर पासून सुरु होणारे काम अद्यापही सुरू झालेले नाही. मार्गताम्हाने गावातील ७०० मीटरचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. शृंगारतळी येथील पुल बांधकाम कामाची सुरुवात झालेली नाही. जोड रस्त्याचे अप्रोच रोड योग्य दर्जाचे बनविलेले नाहीत. आवश्यक ते बस थांबे पुन्हा उभारणे, चिपळूण तालुका खेर्डी गावांमधील गटारांचे बांधकाम करणे, रामपूर चिपळूण या कामाची अद्याप सुरुवात झालेली नाही. रत्नागिरी व सातारा जिल्ह्यातील तालुका चिपळूण पिंपळी ते तालुका पाटण हेळवाक पर्यंतच्या कामाची अद्यापही निविदा कार्यवाही करण्यात आलेली नाही, चिपळूण शहरातील मिसिंग लिंक, चिपळूण मधील दोन बायपास रोड द्वारे जोडण्यास मान्यता देणे या विविध प्रलंबित विषयांकरता मंत्री महोदयाच्या दालनात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत नातू यांनी बैठक घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार ना. रवींद्र चव्हाण यांनी या बैठकांचे आयोजन केले होते. या बैठकांमध्ये सविस्तर चर्चा केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. Marine highway will be re-surveyed

यावेळी रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, चिपळूण तालुकाअध्यक्ष अजित थरवळ, चिपळूण माजी तालुकाध्यक्ष सतीश मोरे, खेड तालुका अध्यक्ष किशोर आंब्रे, ऋषिकेश मोरे, चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, खेर्डी उपसरपंच विनोद भुरण, जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, गुहागर शहराध्यक्ष नरेश पवार, गुहागर नगरपंचायत गटनेते उमेश भोसले, संतोष सांगळे, संतोष मावळणकर, शहराध्यक्ष मंदार पालशेतकर, गणेश भिडे, संदीप वैद्य, माजी नगरसेविका सौ. ज्योती परचुरे, दीपक परचुरे, अमरदीप परचुरे, सिद्धिविनायक जाधव, सौरभ चव्हाण, विनोद चाळके, जगदीश आंब्रे, नागेश धाडवे आदी उपस्थिती होते. Marine highway will be re-surveyed

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsMarine highway will be re-surveyedNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share340SendTweet213
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.