गुहागर, ता. 09 : रेवस – रेड्डी सागरी महामार्गासाठीची दाभोळ व जयगड खाडीवरील पुलासाठी येथील गावात आवश्यक असलेल्या जागेच्या भूसंपदानासाठीची मोजणी सुरू झाली आहे. बुधवार व गुरूवारी तवसाळ व तवसाळ खुर्द या दोन ठिकाणी मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या मोजणीमुळे येत्या काळात दळणवळण्याच्या सुविधेला अधिक प्रमाणात गती मिळणार आहे. Marine Highway Land Acquisition Counting Begins
गुहागर तालुक्यातील गुहागर विजापूर या राष्ट्रीय महामार्गाबरोबर रेवसरेड्डी सागरी महामार्गासाठीची तयारीही शासनातर्फे जोरदारपणे सुरू झाली आहे. दापोली व गुहागरला जोडण्यासाठी दाभोळ खाडीवरील पुल सर्वात मोठा पुल समजला जाणार आहे. तर दुसरीकडे गुहागर व रत्नागिरी तालुक्याला जोडण्यासाठी जयगड खाडीवरील पुलही तितकाच महत्वाचा आहे. सध्या या दोन्ही ठिकाणी फेरीबोट सेवा सुरू आहे. रेवसरेड्डी या सागरी महामार्गासाठी जयगड खाडीवरील पुलासाठी प्रथम गुहागर तालुक्यातील तवसाळ व तवसाळ खुर्द या गावातील भूसंपादानासाठीची मोजणी गेले दोन दिवस सुरू आहे. येथील ग्रामस्थांनीही या मोजणीला सहकार्य केले आहे. तर दुसरीकडे दाभोळ खाडीवरील पुलाकरीता वेलदूर व घरटवाडीतर्फे वेलदूर या गावातील आवश्यक जागेची मोजणी जाहीर करण्यात आली आहे. Marine Highway Land Acquisition Counting Begins
दरम्यान येथील क्षेत्र जास्त लागत असल्याने मोजणीच्या तारखांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. मात्र आतापर्यंत सागर महामार्गासाठी केवळ या चार गावातीलच मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शहरातील बदलत्या मार्गाकडे सर्वाचे लक्ष सागरी महामार्ग गुहागर शहरातून जाताना अनेक अडचणी आहेत. अशावेळी सदर मार्ग हा रेस्टहाऊसच्या वरील बाजुने न्यावा. अशी मागणी शहरवासीयांना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. या बदलत्या मागणीनुसार नव्याने आराखडा तयार करावा लागणार आहे. Marine Highway Land Acquisition Counting Begins