• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 July 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरीत सागरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण

by Mayuresh Patnakar
June 9, 2026
in Ratnagiri
105 1
0
Marine Fisheries Training
207
SHARES
590
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दि. २९ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

​रत्नागिरी, ता 09 : मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणारे ‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण’ आगामी १ जुलैपासून मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, रत्नागिरी येथे सुरू होत आहे. या ६ महिन्यांच्या प्रशिक्षण सत्राचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील पात्र युवकांनी २९ जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी जी. द. सावंत यांनी केले आहे. Marine Fisheries Training

​या प्रशिक्षणाचा कालावधी ६ महिने (१ जुलै ते ३१ डिसेंबर) असून ​वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षे आहे. (सोबत ओळखपत्र व रेशनकार्ड छायाप्रत जोडणे आवश्यक), ​शैक्षणिक पात्रता – किमान चौथी पास आहे. (शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत जोडणे आवश्यक) तसेच उमेदवार क्रियाशील मच्छिमार असावा व त्याला किमान १ वर्ष मासेमारीचा अनुभव असावा. विहीत नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस असणे बंधनकारक आहे. Marine Fisheries Training

​सर्वसाधारण उमेदवारांसाठी प्रशिक्षण शुल्क ₹४५० प्रतिमहिना (६ महिन्यांचे एकूण ₹२,७००) आहे. ​दारिद्र्यरेषेखालील (BPL) उमेदवारांसाठी ₹१०० प्रतिमहिना (६ महिन्यांचे एकूण ₹६००). [टीप: यासाठी ग्रामसेवक किंवा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचा दाखला जोडणे आवश्यक आहे.] Marine Fisheries Training

​प्रशिक्षणाचे फायदे

​या प्रशिक्षणानंतर उमेदवारांना सागरी नौकांवर पात्रतेनुसार ‘खलाशी’ म्हणून रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच राष्ट्रीय सहकार विकास निगम अंतर्गत (NCDC) योजनेतून अर्थसाहाय्य घेऊन स्वतःची मच्छिमारी नौका बांधणेही शक्य होणार आहे. Marine Fisheries Training

​इच्छुक युवकांनी प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्राशी किंवा ९४२२३७१९०१ या मोबाईल व व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधल्यास विहीत नमुन्यातील अर्ज उपलब्ध करून दिला जाईल. हा अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात भरून, त्यावर मच्छिमार संस्थेची शिफारस घेऊन २९ जूनपर्यंत कार्यालयीन वेळेत वर नमूद केलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा ईमेलवर सादर करावा. ​अधिक माहितीसाठी पेठकिल्ला, रत्नागिरी येथील ‘मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी’ यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Marine Fisheries Training

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMarine Fisheries TrainingNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share83SendTweet52
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.