गुहागर, ता. 19 : साऊथ फिल्म जगतामधील प्रसिध्द आदित्य म्युझिकच्या पुष्पा या प्रसिध्द चित्रपटाच्या श्रीवल्ली या गाण्याचे शशांक कोंडवीलकर यांनी मराठीमध्ये रुपातंर केले आहे. स्वतःच्या आदित्य म्युझिकच्या अधिकृत चॅनेलवर ते पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे कोकणातील हे पहिलेच गीतकार आहेत की, त्यांनी पुष्पाचे अधिकृत मराठी श्रीवल्ली हे गीत लिहीले आहे. Marathi Srivalli Music Video Launch
आदित्य म्युझिक कंपनीची संगीतमय भेट गुहागर तालुक्यातील जानवळे गावचे सुपुत्र, आंबाट चिंबाट वेबसिरिजचे निर्माते, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार शशांक सुर्यकांत कोंडविलकर यांनी पुष्पा चिञपटातील श्रीवल्ली या गाण्याचे मराठी रुपातंर करुन गीत लिहीले आहे. या आधीही या कोकणपुञाची गाणी गायक शानू, सुरेश वाडकर, नेहा राजपाल, आदर्श शिदे, सावनी रवींद्र, पल्लवी केळकर अशा दिग्गज गायकांनी स्वरबध्द केली आहेत. श्रीवल्ली हे मराठी गीत गायिका रागिणी कवठेकर यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात गायिले आहे. तर या गाण्याला डॉनी हजारिका या आघाडीच्या संगीत दिग्दर्शकाने संगीतबध्द केले आहे. Marathi Srivalli Music Video Launch
समर्पक शब्द, श्रवणीय संगीत आणि तसेच दृश्य चित्रण हे या गाण्याचे खास वैशिष्ट्ये आहे. त्यामुळे कमी अवधीत या गाण्याला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येकाला आपलेसे वाटणारे हे गाणे सर्वांनी पाहावे आणि चॅनेल वर अभिप्राय हि द्यावा, असे आवाहन निर्मात्यांनी केले आहे. Marathi Srivalli Music Video Launch