• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 December 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुंबईत मराठी पाट्या बंधनकारक

by Guhagar News
November 25, 2023
in Maharashtra
72 1
0
Marathi plates compulsory in Mumbai
141
SHARES
404
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

 महापालिका अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये

मुंबई, ता. 25 : मुंबईत मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरुन मुंबई महानगरपालिका देखील अँक्टिव्ह मोडमध्ये आली आहे. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दुकाने व आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक आहे. Marathi plates compulsory in Mumbai

त्‍यासाठी २४ विभाग स्तरावर दुकाने व आस्थापना खात्यातील पथक गठीत करण्यात आले आहे. त्‍यांना कारवाईचे अधिकार देण्‍यात आले असून दिनांक २८ नोव्‍हेंबर २०२३ पासून कारवाई सुरु करण्यात येणार असल्‍याचे महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने कळवण्‍यात आले आहे. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार बृहन्‍मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दुकाने व आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक आहे. त्‍यासाठी २४ विभाग स्तरावर दुकाने व आस्थापना खात्यातील वरिष्‍ठ सुविधाकार व सुविधाकारांचे पथक गठीत करण्यात आले आहे. त्‍यांना कारवाईचे अधिकार देण्‍यात आले असून दिनांक २८ नोव्‍हेंबर २०२३ पासून कारवाई सुरु करण्यात येणार असल्‍याचे महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने कळविण्‍यात येत आहे. Marathi plates compulsory in Mumbai

मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी व्यापक बैठक घेऊन माननीय सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश सर्व संबंधितांना दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ.अश्विनी जोशी आणि उप आयुक्‍त (विशेष) श्री. संजोग कबरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करीता विभाग स्तरावर दुकाने व आस्थापना खात्यातील वरिष्‍ठ सुविधाकार व सुविधाकारांचे पथक गठीत करण्यात आले आहे. सदर कारवाई दरम्यान ज्या दुकाने व आस्थापनांनी अधिनियमांची तरतुद व माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश यानुसार मराठी नामफलक मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात लावले नसल्यास अशा दुकाने व आस्थापना मालकांवर अधिनियमातील तरतुदीनुसार न्यायालयीन कार्यवाही करण्यात येईल. सदर बाब सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनामार्फत स्‍पष्ट करण्‍यात आले आहे. Marathi plates compulsory in Mumbai

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMarathi plates compulsory in MumbaiNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share56SendTweet35
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.