• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन

by Guhagar News
March 3, 2025
in Guhagar
120 1
0
Marathi Language Pride Day at Patpanhale School
236
SHARES
673
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.03 :  तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात पर्यवेक्षक जी.डी. नेरले यांच्या अध्यक्षतेत मराठी भाषा गौरव दिन नुकताच उत्साहात संपन्न झाला. ज्येष्ठ साहित्यिक कवीवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाध्यक्ष  विद्यालयाचे पर्यवेक्षक जी. डी. नेरले यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले. Marathi Language Pride Day at Patpanhale School

यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. एस.एस. चव्हाण, प्रा. सौ. एम. एस. जाधव, प्रा. एस. एस. मोरे उपस्थित होते. मान्यवरांचा व विद्यार्थी प्रतिनिधी यांचे सांस्कृतिक विभागातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कु. समृद्धी आंबेकर, मृण्मयी जाधव, मानसी पालकर, मैथिली कदम, संजना चव्हाण या विद्यार्थिनींनी मराठी भाषा, कवीवर्य कुसुमाग्रजांचा जीवन परिचय व साहित्य क्षेत्रामधील कार्य, मराठी भाषेचे महत्व आदी मुद्द्यांनुसार मनोगत व्यक्त केले. Marathi Language Pride Day at Patpanhale School

मार्गदर्शक प्रा. सौ.एम. एस. जाधव यांनी जेष्ठ साहित्यिक कविवर्य कुसुमाग्रज यांचे साहित्य क्षेत्रामधील कार्य,  मराठी वाड्मयाची ओळख,  मराठी भाषेचे महत्व, प्रा.एस. एस.मोरे यांनी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा उद्देश, कवीवर्य कुसुमाग्रज यांचे मराठी भाषेला लाभलेले योगदान,  वाचनाचे महत्त्व व वाचनाची सवय तसेच कार्यक्रमाध्यक्ष व पर्यवेक्षक प्रा. जी. डी.नेरले यांनी मातृभाषेचे महत्व, मराठी साहित्य संमेलनाचे महत्व, ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांचे साहित्य क्षेत्रामधील योगदान यावर मार्गदर्शन केले. सदरच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माध्यमिक विभागाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. एस. एस. चव्हाण यांनी केले. Marathi Language Pride Day at Patpanhale School

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi Language Pride Day at Patpanhale SchoolMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share94SendTweet59
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.