गुहागर, ता. 28 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे येथे मराठी राजभाषा दिन कार्यक्रम मुख्याध्यापक श्री. एम.ए.थरकार यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला. Marathi Language Day in the Patpanhale school
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2023/02/add-3-2.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2023/02/add-3-2.jpg)
सदर कार्यक्रमानिमित्त साक्षी पवार व अंजली खांडेकर या विद्यार्थिनींनी मराठी अभिमान गीत गायन करून मराठी भाषेचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच बहुसंख्य विद्यार्थ्यांनी मायबोली मराठी व कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील मौलिक योगदान याबाबत मनोगत व्यक्त केली. वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला माध्यमिक सांस्कृतिक विभाग प्रमुख व मराठीच्या शिक्षिका सौ. एस.एस.चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ” हे राज्यगीत सामूहिकरित्या विद्यार्थ्यांनी गायनातून सादर केले. तसेच लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, हे मराठी अभिमान गीत इयत्ता अकरावी वाणिज्य शाखेतील साक्षी विजय पवार व अंजली अशोक खांडेकर या विद्यार्थ्यांनी सुश्राव्य गायले. सदरच्या दोन्ही गीतांना इयत्ता नववीतील विद्यार्थी वेदांत गुरव याने पेटी वादनाची उत्तम साथ दिली. Marathi Language Day in the Patpanhale school
मराठी राजभाषा दिनानिमित्त सहाय्यक शिक्षक श्री.एस.एस. घाणेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी मायबोली मराठी व ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यासाठी लाभलेले योगदान याबाबत मनोगते व्यक्त केली. उच्च माध्यमिक सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख प्राध्यापक सौ. एम.एस. जाधव यांनी मराठी भाषेचे महत्त्व, मराठी भाषेचा करायचा वापर, साहित्यिक व कवी कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान आदी मुद्द्यांनी मार्गदर्शन केले. Marathi Language Day in the Patpanhale school
![https://ayurzeal.com/](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2023/02/add-.jpg)
![https://ayurzeal.com/](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2023/02/add-.jpg)
सहाय्यक शिक्षक श्री.एस. एम. आंबेकर यांनी जगात व देशात असणारे मराठीचे स्थान व मराठीचा होणारा वापर, मराठी संत व मराठी साहित्यिक यांचे मराठी भाषेसाठी लाभलेले योगदान, मराठी भाषा वृद्धिंगत होण्यासाठी करावयाचे प्रयत्न आदी मुद्द्यांबाबत मार्गदर्शन केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्याध्यापक श्री. थरकार यांनी मराठी भाषेचे मोल, कार्यक्रम साजरा करावयाचा हेतू, श्रेष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांचे योगदान आदी विषयांबाबत मार्गदर्शन केले. Marathi Language Day in the Patpanhale school
सदरच्या मराठी राजभाषा दिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख व मराठी शिक्षिका सौ. एस.एस. चव्हाण यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक एम.ए.थरकार, प्रा. सौ. एम.एस. जाधव, सौ.एस. एस. चव्हाण , श्री. एस.वाय.भिडे, श्री. एस.एस. घाणेकर, श्री.एस.एम आंबेकर, श्री.व्ही.व्ही. पवार आदी शिक्षकवृंद उपस्थित होते. Marathi Language Day in the Patpanhale school