गुहागर तालुक्यातील आंबा बागायतदार आणि व्यवसायीकांसाठी
गुहागर, ता. 06 : तालुक्यातील तवसाळ गावचे सुपुत्र आणि नोकरी – व्यवसायानिमित्ताने चिंचवड पुणे येथे स्थायिक असणारे राजेंद्र रमेश गडदे यांच्या साहिल मँगो सप्लायर्स समुहाच्यावतीने गुहागर तालुक्यातील आंबा बागातदार आणि व्यवसायिकांसाठी एकदिवशीय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. Mango Gardener Workshop
गुहागर तालुक्यातील सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या हेदवी येथील हॉटेल सुरुची कॉर्नर येथे ही कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये सन. एज. मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडचे वैभव शिंगटे यांनी उपस्थित आंबा व्यवसायिक आणि बागायतदारांना मार्गदर्शन केले. आंबा बागायतींचे वर्षभराचे व्यवस्थापन कसे असावे, त्याला कोणत्या प्रकारची सेंद्रिय, जैविक खते वापरावीत, कोणत्या प्रकारची औषधे फवारावीत,आंबा हे अतिशय संवेदनशील फळ असल्याकारणाने त्याची भरणी कशी असावी, त्याची उगा निगा कशी ठेवावी आणि मग आपल्याला चांगला दर कसा मिळेल. याबाबत सविस्तरपणे मार्गदर्शन करत असतानाच उपस्थित आंबा व्यवसायिक आणि बागायतदारांच्या व्यथा समजुन घेऊन त्यांना योग्य रीतीने मार्गदर्शन केले. तसेच आंबा व्यवसायासाठी संपुर्ण वर्षभर लागणारी खते, औषधे योग्य दरात, योग्य वेळी पोहोचवुन शास्त्रशुद्ध तंत्रज्ञानाने वापर कसा करावा याचे प्रत्यक्षात येऊन मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले. Mango Gardener Workshop
रासायनिक शेतीची वाट सोडुन शुन्य खर्चाच्या आणि दर्जेदार, भरघोस उत्पादनासाठी सेंद्रिय शेतीचा वापर शेतकऱ्यांनी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांच्या समवेत साहिल मॅंगो सप्लायर्सचे सर्वेसर्वा राजेंद्र गडदे, आदित्य एमले आदि मान्यवर उपस्थित होते. Mango Gardener Workshop
या कार्यशाळेला गुहागर तालुका भाजपाचे अध्यक्ष निलेश सुर्वे, कातळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रसाद सुर्वे, तवसाळ पडवे सोसायटीचे संचालक श्याम शेठ गडदे, प्रकाश सुर्वे, मंदार सुर्वे, योगेश डिंगणकर, संजय डींगणकर, निलेश देसाई, विनायक सुर्वे, विघ्नेश गडदे, प्रीतम सुर्वे, कीरण गडदे, विजय शिवलकर, संदिप सुर्वे, परेश गडदे आदीसह बहुसंख्य आंबा व्यवसायिक उपस्थित होते. Mango Gardener Workshop
यावेळी सन. एज.मार्केटिंगचे वैभव शिंदे यांचा आंबा बागायतदार आणि व्यवसायिकांकडुन शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर शेतकऱ्यांसाठी आणि आंबा बागायतदारांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल साहिल मँगो सप्लायर्सचे सर्वेसर्वा राजेंद्र रमेश गडदे यांचे आभारही व्यक्त करण्यात आले. Mango Gardener Workshop