गुहागर, ता. 29 : पालघर जिल्ह्यातील मुंबई कोकण वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत धोपावे मधील मंगलेश कोळथरकर याने प्रथम क्रमांक पटकावला. ही स्पर्धा जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेकडून भरवण्यात आली होती. राज्यभरातील 8 हजार 500 स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला होता. ही कोकणातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. Manglesh won the marathon


महाराष्ट्राच्या क्रीडा नकाशावर पालघर जिल्ह्याला गाजवत ठेवणाऱ्या मुंबई कोकण वर्षा मॅरेथॉन स्पर्धा सात वर्षांपूर्वी पासून सुरु आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून धावपटूंना निमंत्रित केले जाते. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था या स्पर्धेचे आयोजन करते. Manglesh won the marathon
पालघरमधील जिजाऊ नगरी झडपोली येथे 21 ऑगस्ट रोजी मुंबई कोकण वर्षा मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. राज्यभरातील 8 हजार 500 स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला होता. गुहागर तालुक्यातील धोपाव्याचा, खारवी समाज सुपुत्र मंगलेश अनिल कोळथरकर याने 21 किलोमीटरचे अंतर 1 तास 33 मिनिटाने पुर्ण केले. त्याने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्याबद्दल त्याचे, त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे व पालकांचे कर्तव्य ग्रुप कुडली यांसकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले. Manglesh won the marathon


मंगलेश कोळथरकर यांनी शिक्षण घेताना वेगळं काही तरी करावं म्हणून तो धावू लागला. स्पर्धात भाग घेताना क्षमता कशी टिकवायची, संतुलित आहात कोणता घ्यावा, प्रत्यक्ष धावताना उर्जा येण्यासाठी आपण कधी व कीती प्रमाणात उर्जा देणारे पेय घ्यावे आदी गोष्टी तो स्वत:च शिकला. मैदानावर धावताना त्याला धावण्याचा छंद लागला. या छंदापोटी गेले दोन ते तीन वर्षे मंगलेश धोपावे ते तळी रस्त्यांवर धावण्याचा सराव करत असे. मॅरेथॉन पूर्ण करण्याचे लक्ष्य होते. Manglesh won the marathon