• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
31 July 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

by Mayuresh Patnakar
July 31, 2026
in Guhagar
97 1
0
Mangalsutra snatched from woman's neck
190
SHARES
544
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आरे पाटपन्हाळे रस्त्यावरील घटना

गुहागर, ता. 31 : तालुक्यातील आरे ते पाटपन्हाळे जाणाऱ्या रस्त्यावर भरदिवसा एका पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी, दिनांक ३० जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी गुहागर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. Mangalsutra snatched from woman’s neck

या प्रकरणी सौ. अवनी समीर पागडे (वय ३६ वर्षे, रा. मु. वाकी, पो. आरे स्वातंत्र्यवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. पागडे यांचे वाकी पिंपळवट सीमेवर किराणा मालाचे दुकान आहे. गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास दुकान बंद करून त्या आपल्या मुलीला शाळेतून आणण्यासाठी आरे ते पाटपन्हाळे या रस्त्याने पायी निघाल्या होत्या. त्यावेळी एक अज्ञात व्यक्ती काळ्या रंगाच्या दुचाकीवरून त्यांच्या जवळ आली. या दुचाकीस्वाराने अंगात काळ्या रंगाचा रेनकोट आणि डोक्यावर हेल्मेट घातले असल्यामुळे त्याचा चेहरा दिसू शकला नाही. त्याने सौ. पागडे यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावले आणि दुचाकीवरून पाटपन्हाळे गावाच्या दिशेने धूम ठोकली. Mangalsutra snatched from woman’s neck

चोरट्याने पळवून नेलेले हे एक पदरी सोन्याचे मंगळसूत्र असून त्यामध्ये काळे व सोन्याचे मणी गुंफलेले आहेत आणि त्याला एक डवळी (वाटी) आहे. सुमारे पाच ग्रॅम वजनाच्या या जुन्या वापरत्या मंगळसूत्राची किंमत अंदाजे २५ हजार रुपये इतकी आहे. अचानक घडलेल्या या प्रकाराने घाबरलेल्या सौ. पागडे यांनी तात्काळ गुहागर पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी ७.०८ वाजता अज्ञात आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता कायदा ३०४ (२) अंतर्गत (गु. र. क्र. ६८/२०२६) गुन्हा दाखल केला आहे. भरदिवसा घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस आता अज्ञात गाडीचा आणि आरोपीचा शोध घेत आहेत. Mangalsutra snatched from woman’s neck

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMangalsutra snatched from woman's neckMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share76SendTweet48
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.