संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 17 : तालुक्यातील कुडली गावचे सुपुत्र व महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका उपाध्यक्ष श्री.मंदार मुकुंद रहाटे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करीत शिवसेना पक्षात (शिंदे गटात) जाहिर प्रवेश केला आहे. Mandar Rahate’s entry into the Shinde group
शिंदे गटाचे शिवसेनेचे लढवय्ये नेते, माजी मंत्री श्री.रामदासभाई कदम, जिल्हा प्रमुख श्री.शशिकांत चव्हाण, विधानसभा क्षेत्राध्यक्ष श्री.आनंद भोजने यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राजकीय धक्का देत शिंदे गटाच्या शिवसेना तालुका गुहागर या राजकीय पक्षात नुकताच जाहीर प्रवेश करुन सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. यावेळी तालुका विधानसभा क्षेत्राध्यक्ष श्री.आनंद भोजने यांचे हस्ते माळ गळ्यात घालून श्री.मंदार मुकुंद रहाटे स्वागत केले. यावेळी मासू गावातील शिवसेनेचे शाखा प्रमुख श्री.विजय सिताराम भोजने, उपशाखा प्रमुख श्री.चंद्रकांत गंगाराम जाधव शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. Mandar Rahate’s entry into the Shinde group
पक्षप्रवेशा नंतर आबलोली येथील पत्रकारांशी बोलताना श्री.मंदार मुकुंद रहाटे म्हणाले की, मी माझ्या पडवे जिल्हा परिषद गटात घर तेथे भगवा व गाव तेथे शाखा निर्माण करुन सन्मानणीय मुख्यमंत्री साहेबांचे हात अधिक बळकट करणार आहे आणि पडवे जिल्हा परिषद गटात शिंदे गटाच्या शिवसेना पक्षाचा भगवा फडकवून आगामी होणा-या लोकसभा, विधानसभा तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद गटात निवडणुकीत गुहागर विधानसभा क्षेत्राध्यक्ष श्री.आनंद भोजने यांच्या नेतृत्वाखाली पक्ष देईल त्या उमेदवाराचा प्रामाणिकपणे प्रचार करुन त्या उमेदवाराला निवडून आणणार आणि पडवे जिल्हा परिषद गटातून मतदानाची १००% आघाडी मिळवून देणार असे सांगून लवकरच शिवसेनेचे लढवय्ये नेते, माजी मंत्री श्री.रामदासभाई कदम यांची गुहागर तालुक्यात जाहिर सभा होणार आहे . त्यावेळी माझ्या अनेक कार्यकर्त्यांचा मी शिंदे गटाच्या शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश करुन घेणार आहे. असा निर्धारही श्री.मंदार रहाटे यांनी केला आहे. Mandar Rahate’s entry into the Shinde group