संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 29 : राज्याच्या राजकारण आणि समाजकारण तसेच सरकार वर दबावतंत्र टाकण्यात यशस्वी झालेल्या बळीराज सेनेत येत्या काळात मोठे संघटनात्मक बदल होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. पक्षप्रमुख अशोक वालम यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक साठी कार्यकर्ते व पदाधिकारी यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. Major changes in the Baliraj Sena
बळीराज सेनेने अवघ्या दोन वर्षात राज्यात आपला चांगलाच जम बसवीला आहे अनेक अनुभवी पदाधिकारी व कार्यकर्ते पक्ष्याकडे येत असल्याने संघटनेचे कार्य जलद गतीने होतं आहे. याशिवाय पक्षप्रमुख वालम यांचा सरकार जवळ थेट सबंध असल्याने बहुजन समाजाची सरकार दरबारची कामे बळीराज सेने मार्फत होतं आहेत. त्यातच लोकनेते शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ निर्माण करून त्याला ठोस निधी मिळाला आहे. या महामंडळाचे कामं नवनिर्वाचित अध्यक्ष भानगरथ यांचे नियोजन नुसार लवकरच सुरु होतं आहे. यामुळे बहुजन समाजाला आर्थिक विकास करता येणार आहे. Major changes in the Baliraj Sena


दरम्यान 80% समाजकारण व 20% राजकारण या तत्वावर बळीराज सेना आता खेडोपाडी पोहचली असल्याने नवतरुण कार्यकर्ते बळीराज सेनेला अधिक पसंती देत आहेत. येत्या काळात पक्षातर्गत मोठे बदल होणार आहेत पक्षाचे जुनेजानते नेते कृष्णा कोबानाक यांचे निधन झाल्याने त्यांचे जागी कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहिती नुसार शरद बोबले यांचेवर पक्ष मोठी जबाबदारी देणार आहे तर कोकण विभाग मध्ये सुद्धा नवे चेहरे दिसणार आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यसमोर ठेऊन मुंबई विभागात बळीराज सेनेचे संघटन वाढत आहे. सरकारला याकडे निश्चितच पहावे लागेल, असे मत काही राजकीय त्यांनी व्यक्त केले आहे. Major changes in the Baliraj Sena