बचत प्रमाणपत्र योजनेस प्रारंभ
रत्नागिरी, ता. 07 : केंद्र सरकार पुरस्कृत “महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2023” या योजनेस बँक ऑफ इंडियाच्या (लिड बँक) सर्व शाखांमध्ये दि. 3 जुलैपासून मुंबई येथे बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक श्री. रजनीश कर्नाटक यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे प्रारंभ करण्यात आला. Mahila Samman Scheme by Bank of India

सिंगल मुलगी, महिला अथवा अल्पवयीन मुलीच्या वतीने कुटुंबातील इतर सदस्य या योजनेमध्ये सामील होवू शकतात. यामध्ये कमीत कमी 1 हजार ते जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवणूक करता येवू शकते. या योजनेंतर्गत 31 मार्च 2025 पर्यंत लाभधारकांना खाते उघडता येवू शकेल. रक्कम गुंतविल्यानंतर किमान दोन वर्षानंतर लाभधारकांना याचा लाभ घेता येवू शकेल. यामध्ये संबधिताला नॉमिनेशन (वारसदार) करण्याची सुविधा असून एका वर्षानंतर गुंतवलेल्या रकमेतून सुमारे 40 टक्के इतकी रक्कम खातेदाराला काढता येवू शकते. Mahila Samman Scheme by Bank of India
यापूर्वी ही सुविधा केवळ पोस्टात उपलब्ध होती. तथापि ही योजना बँक ऑफ इंडियाने सुरु केली आहे. ही योजना सुरु करणारी सदरची बॅक ही पहिली बँक ठरली असून जिल्हयातील महिला वर्गाने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रणी बँकेचे (लीड बॅक) व्यवस्थापक मुकुंद खांडेकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे. Mahila Samman Scheme by Bank of India
