• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 October 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

श्री देव व्याडेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव

by Mayuresh Patnakar
February 14, 2023
in Guhagar
207 2
0
Mahashivratri festival at Vyadeshwar temple
406
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 14 :  श्री देव व्याडेश्वर देवस्थान गुहागर येथे प्रतिवर्षीप्रमाणे शनिवार दि. 18 फेब्रुवारी 2023 रोजी श्रींचा महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने धार्मिक कार्यक्रमांबरोबर विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Mahashivratri festival at Vyadeshwar temple

महाशिवरात्री उत्सवनिमित्त शनिवार दि. 18 रोजी सकाळी ७ ते 9.30 वा. श्रींची षोडशोपचारे पुजा व लघुरुद्र, सकाळी 8 ते सायं. 7 पर्यंत भव्य प्रदर्शन, दु. 12 वा. महाआरती, दु. 2 ते 7 वा. सुस्वर भजने, रात्रौ 8.30 ते 9.30 वा. श्री देव व्याडेश्वर दिंडी सेवा मंडळ चिखली यांचे वारकरी कीर्तन, रात्रौ 10 वा. ढोल पथक, टाळ मृदुंगाच्या गजरात श्रींची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. Mahashivratri festival at Vyadeshwar temple

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

सोमवार 20/02/2023 ते बुधवार 22/02/2023 असे दोन दिवस संध्या 6 ते 10 या वेळेत श्री व्याडेश्वर महाशिवरात्री महोत्सवानिमित्त रेकॉर्ड डान्स, पालखी नृत्य, जाखडी नृत्य,  दांडीया, आर्केस्ट्रा, मंगळागौर, जादुचे प्रयोग, नमन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सर्वांसाठी विविध करमणूकीचे कार्यक्रम, विविध शाकाहारी पदार्थाचे स्टॉल, विविध वस्तूचे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. तरी या सर्व कार्यक्रमांसाठी उपस्थित राहून सहकार्य करावे अशी विनंती श्री देव व्याडेश्वर फंडाच्या विश्वस्थ व उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. Mahashivratri festival at Vyadeshwar temple

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMahashivratri festival at Vyadeshwar templeMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share162SendTweet102
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.