गुहागर, ता. 25 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान गुहागर येथे प्रतिवर्षीप्रमाणे बुधवार दि. 26 फेब्रुवारी 2025 रोजी श्रींचा महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने धार्मिक कार्यक्रमांबरोबर, शस्त्र प्रदर्शन आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या व्याडेश्र्वर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. Mahashivratri at Vyadeshwar Temple
बुधवार दि. 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री उत्सवनिमित्त व्याडेश्र्वर मंदिरात सकाळी ७ ते 9.30 वा. श्रींची षोडशोपचारे पुजा व लघुरुद्र, दु. 12 वा. महाआरती, दुपारी 11 ते 7 वा. सुस्वर भजने, रात्रौ 8.30 ते 9.30 वा. श्री देव व्याडेश्वर दिंडी सेवा मंडळ चिखली यांचे वारकरी कीर्तन, रात्रौ 10 वा. ढोल पथक, टाळ मृदुंगाच्या गजरात श्रींची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. Mahashivratri at Vyadeshwar Temple


याच दिवशी व्याडेश्र्वर मंदिराच्या प्रांगणात शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भाविकांसाठी आयोजित केले आहे. कोकण दौलत प्रतिष्ठानच्या वतीने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये भाविकांना शिवकालीन विविध प्रकारच्या कट्यार, भाले, तलवारी, दांडपट्टा, चिलखत अशी अनेक शस्त्रे पहाता येणार आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी या शस्त्र प्रदर्शन आवर्जुन पहावे. असे आवाहन देवस्थानने केले आहे. Mahashivratri at Vyadeshwar Temple


व्याडेश्र्वर महोत्सव
महाशिवरात्रीच्या निमित्ताने व्याडेश्र्वर देवस्थान पोलीस परेड मैदानावर दरवर्षी तीन दिवसीय व्याडेश्र्वर महोत्सवाचे आयोजन करते. या महोत्सवामुळे स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळते. तसेच पोलीस परेड मैदानात विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावले जातात. त्यातून कोकणातील खाद्यसंस्कृतीचेही दर्शन होते. हा महोत्सव मनोरंजनात्मक असतोच त्याचबरोबर तीन दिवसांत रोजगार आणि आर्थिक उलाढालीतून कलाकार, विविध उद्योजकांना साह्यभूत ठरतो. त्यामुळे गुहागर तालुकावासीय या महोत्सवाला दरवर्षी उत्स्फुर्त प्रतिसाद देत असतात. Mahashivratri at Vyadeshwar Temple


यावर्षीही शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी ते रविवार दि. 02 मार्च 2025 रोजी असे तीन दिवस संध्याकाळी 6 ते 10 या वेळेत श्री व्याडेश्वर महाशिवरात्री महोत्सवानिमित्त निमंत्रितांचे दर्जेदार विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध शाकाहारी पदार्थाचे स्टॉल, विविध वस्तूचे स्टॉल, लहान मुलांकरिता मनोरंजनाचे खेळ असा व्याडेश्र्वर महोत्सव पोलीस परेड मैदानावर रंगणार आहे.
शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी समीर महाडिक प्रस्तुत गजर महाराष्ट्राचा वारसा परंपरेचा या कार्यक्रमाबरोबरच संस्कारवर्ग गुहागर यांचे योग नृत्य, जादूगार अवधूत यांचे जादूचे प्रयोग, ओम साई डान्स ग्रुप खेड यांचा नृत्य कलाविष्कार सादर केला जाणार आहे.
शनिवार दि. 01 मार्च 2025 रोजी आरती दीक्षित पुणे प्रस्तुत गोल्डन मेलडीज हा हिंदी मराठी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. त्यासोबत रत्नागिरीतील कथासार्थक डान्स ग्रुपचे नृत्य, मल्लखांब प्रात्यक्षिके, महिलांचा ग्रुप डान्स असे कार्यक्रम आहेत.
रविवार दि.02 मार्च 2025 रोजी समर्थ कृपा प्रॉडक्शन रत्नागिरी प्रस्तुत गाज कोकणची – साद संस्कृतीची या कार्यक्रमाबरोबर कोकण कन्या डान्स ग्रुप असगोली, स्टुडिओ 23 डान्स ग्रुप चिपळूण, आगडीदेवी डान्स ग्रुप पालशेत आणि नृत्यमल्हार कथ्थक अकादमी चिपळूण यांचे संस्थांचा नृत्य आविष्कार रसिकांना पहाता येणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांसाठी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन श्री देव व्याडेश्वर फंडाच्या विश्वस्थ व उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. Mahashivratri at Vyadeshwar Temple