शिल्पा परांडेकर यांची संस्था जपत आहे महाराष्ट्राचा वारसा
गुहागर, ता.02 : महाराष्ट्राचा सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक, पारंपरिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी महासंस्कृती व्हेंचर्स (Mahasanskrit Ventures) ही एक प्रकारची चळवळच उभारण्यात आली आहे. या संस्थेतर्फे कोकणातील संस्कृती जतन करण्यासाठी योगदान देणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा सन्मान मुंबईत होणार आहे. १८ ऑक्टोबर २०२२ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई, नरीमन पॉइंट येथे होणाऱ्या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थितीत रहाणार आहेत. Mahasanskrit Ventures
Mahasanskrit Ventures चा परिचय
महासंस्कृतीच्या संस्थापिका शिल्पा परांडेकर यांनी महाराष्ट्राचा सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक, पारंपरिक वारसा (Cultural, historical, social, traditional heritage) जाणून घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवास केला. जवळपास महाराष्ट्रातील ३० जिल्हे, २८७ तालुके आणि ६०० पेक्षा अधिक गावं, वस्त्या व पाडे फिरून तेथील विस्मरणात गेलेली खाद्यसंस्कृती, लोकसंस्कृती जतन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या प्रवासात त्यांनी १५०० पेक्षा अधिक खाद्यपदार्थांची माहिती संग्रहित केली आहे. या प्रवासानंतर त्यांच्या लक्षात आले की, महाराष्ट्राची ही संस्कृती जतन करायची असेल तर अनेक लोकांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणले पाहिजे. त्यांतून महासंस्कृती व्हेंचर्स या संस्थेची स्थापना झाली. Mahasanskrit Ventures
आपल्या लोककलांचा, संस्कृतीचा व विस्मृतीत चाललेला वारसा जतन करण्यासाठीचे महासंस्कृती व्हेंचर्स हे उत्तम व्यासपीठ आहे. या संस्थेत अनेक तज्ञ, अभ्यासू आणि उत्साही मंडळी आहे, जी आपल्या संस्कृतीचा गोडवा टिकावा यासाठी रात्रंदिवस मेहनत करून आपले योगदान देत आहेत. या क्षेत्रात काम करण्याची इच्छा बाळगणाऱ्या नवख्या मंडळीसाठी अतिशय सखोल व माहितीपूर्ण ज्ञानाची भर घालणारी वाट महासंस्कृती व्हेंचर्स मार्फत गवसते. Mahasanskrit Ventures
‘द अनएक्सप्लोर लेगसी’
‘द अनएक्सप्लोर लेगसी’ या सिरीजच्या अंतर्गत महासंस्कृती व्हेंचर्सने संस्कृती जोपासण्याच्या आणि सौंदर्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा असलेला प्रदेश कोकणपासून आपल्या प्रवासाची सुरुवात केली आहे. कोकण प्रदेशातील खाद्यसंस्कृती, लोकसंस्कृती, नयनरम्य समुद्रकिनारे, सह्याद्रीची पर्वतरांग, निसर्गसौंदर्य, लाल माती, फळे, दुर्ग अशा अनेक घटकांची निर्मिती कशी झाली, त्यामागील इतिहास काय आणि कोकणच्या निर्मितीपासून ते आजपावेतो झालेल्या बदलांचा पैलू उलगडण्याचा यातून प्रयत्न होत आहे. महत्त्वाचे म्हणजे या काळात विस्मरणात चाललेली संस्कृती टिकविण्यासाठी अनेक तज्ज्ञ मंडळींना एकत्र आणून त्यावर काम केले जात आहे. याकरिता महासंस्कृती व्हेंचर्स या संस्थेत हजारो इन्फ्लुयन्सर्स देखील जोडले गेले आहेत. त्यामुळे निश्चितच महासंस्कृती कुटुंब हे दिवसागणिक वाढतच आहे आणि ही समृद्ध महाराष्ट्राचा वारसा जतन करण्यासाठी मोलाची बाब ठरणार आहे. Mahasanskrit Ventures
रानभाज्यांना दिली प्रतिष्ठा
आजपर्यंत महासंस्कृतीतर्फे अनेक उपक्रम राबविण्यात आले असून त्यात प्रामुख्याने उल्लेख करायचा झाला तर आरोग्यदायी रानभाज्या आणि कोकणातील पारंपरिक पदार्थ हे सर्वदूर पसरावेत व त्यांचे अस्तित्व टिकून राहावे याकरिता ‘चव रानभाज्यांची व कोकणातील पारंपरिक पदार्थ’ या पाककला स्पर्धेचे पावस येथे आयोजन करण्यात आले होते. यात अनेकांनी सहभाग नोंदवला व निरनिराळे चविष्ट, चटकदार पदार्थ बनवून कोकणातील खाद्यसंस्कृतीचे वेगळेपण सिद्ध केले. यासोबतच कोकण फोटोग्राफी स्पर्धा, इन्फ्लुयन्सर्स बैठक आयोजित करून तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन असे विविध उपक्रम वेळोवेळी राबविले जातात. Mahasanskrit Ventures
कोकणवासीयांचा सन्मान
कोकणातील संस्कृती जतन करण्यासाठी योगदान देणाऱ्या तमाम तज्ञ व अभ्यासू, उद्योजकांचा, महिलांचा आणि लोककलाकारांचा तसेच तरूण इन्फ्लुयन्सर्सचा सन्मान करण्यासाठी १८ ऑक्टोबर २०२२ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई, नरीमन पॉइंट येथील सभागृहात महासंस्कृती व्हेंचर्सचा भव्य कार्यक्रम संपन्न होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या सोहळ्यात या सर्व तज्ज्ञ मंडळींचा सत्कार संपन्न होणार आहे. यासोबतच कोकणच्या संस्कृतीवर आधारित मासिक, कॉफी टेबल बूक यांचे लॉंचिंग होणार असून सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये कोकणातील लोककलाकारांचा कलाविष्कार अनुभवायला मिळणार आहे. Mahasanskrit Ventures
Mahasanskrit Ventures मध्ये सहभागी व्हा
ज्या व्यक्तींना किंवा संस्थांना तसेच आपली संस्कृती जोपासण्याच्या अनुषंगाने वाटचाल करणाऱ्या सर्वांना महासंस्कृती या भव्य समुदायासोबत काम करण्याची इच्छा असेल त्यांनी निश्चितच संपर्क साधावा. शिवाय आपला सांस्कृतिक, ऐतिहासिक, नैसर्गिक वारसा जपण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत असणाऱ्यांना महासंस्कृतीकडून काही मार्गदर्शन किंवा सहाय्य हवे असेल तर त्यासाठी महासंस्कृती नेहमीच मदतीसाठी आपल्या सोबत उभी राहील असे महासंस्कृतीच्या संस्थापिका शिल्पा परांडेकर यांनी आवाहन केले आहे. Mahasanskrit Ventures
गुहागरातील वैविध्यपूर्ण पर्यटनाचे विविध व्हिडिओ पहा