चिपळूणमधील डीबीजे महाविद्यालयाच्या तन्वी रेडीज हीचा समावेश
गुहागर, ता. 06 : महाराष्ट्राच्या महिलांनी उत्कृष्ट समन्वय दाखवत ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धातील योगासनात सांघिक सुवर्णपदकाची बाजी मारली. सुवर्णपदकासह एक रौप्य व एक कांस्यपदकही जिंकले. या संघामध्ये चिपळूणमधील डीबीजे महाविद्यालयाच्या तन्वी रेडीज चा समावेश आहे. नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. मंगेश तथा बाबू तांबे व संचालकांनी तिचे अभिनंदन केले आहे. Maharashtra women win gold medal in yoga


हेमवती नंदन बहुगुणा स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या योगासन स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या सुहानी गिरीपुंजे, छकुली सेलोकर, तन्वी रेडीज, रचना अंबुलकर व पूर्वा किनरे यांनी ११२.१३ गुण नोंदवित सुवर्णपदक जिंकले. या खेळाडूंनी त्यांना दिलेल्या मर्यादित वेळेमध्ये अतिशय विलोभनीय रचना सादर केल्या. त्यामुळे परीक्षकांनी त्यांना सर्वोत्तम गुण बहाल केलेच, प्रेक्षकांनीही त्यांचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. Maharashtra women win gold medal in yoga


पुरुषांच्या कलात्मक वैयक्तिक विभागात सोलापूरचा रुपेश सांगे याने रौप्य पदक संपादन केले. अटीतटीच्या लढतीत त्याने देखिल अतिशय सुरेख रचना सादर केल्या होत्या. अखेर त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. त्याने ११७.८८ गुणांची कमाई केली. सुहानी हिने पारंपरिक योगासनामध्ये कांस्यपदक पटकावित आपल्या नावावर आणखी एक पदक नोंदविले. नागपूरच्या या खेळाडूने या क्रीडा प्रकारात ६०.५८ गुणांची नोंद केली. Maharashtra women win gold medal in yoga