• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 October 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महाराष्ट्राची पदक तालिकेत पुन्हा एकदा आघाडी

by Manoj Bavdhankar
February 6, 2023
in Sports
58 1
0
Maharashtra leads the medal table again
115
SHARES
328
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 06 : जिम्नॅस्टिकमध्ये संयुक्ता काळेने मारलेल्या सुवर्ण चौकारामुळे महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा पदक तालिकेत आघाडी घेतली. महाराष्ट्राची आता २६ सुवर्ण, २९ रौप्य आणि २४ ब्रॉंझ अशी ७९ पदके झाली आहेत. हरियाणा २२, १६, १५ अशा एकूण ५३ पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. मध्य प्रदेश २१, १३, १९ अशा एकूण ५३ पदकांसह तिसऱ्या स्थानी कायम आहे. Maharashtra leads the medal table again

महाराष्ट्राला आता उद्यापासून सुरु होणाऱ्या वेटलिफ्टिंग प्रकारातून चांगल्या यशाची अपेक्षा आहे. त्याचवेळी कुस्तीतही महाराष्ट्र यश मिळवेल अशी आशा आहे. मात्र, या दोन्हीत महाराष्ट्राला हरियाणाच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. या दोन खेळाबरोबरच जलतरण स्पर्धेतील पदकावर आता पदकतालिकेतील क्रमवारी अवलंबून राहणार असेल यात शंका नाही. Maharashtra leads the medal table again

कबड्डीत मुलांचा विजय

गेल्या स्पर्धेत ब्राँझपदक विजेत्या महाराष्ट्राने बिहारचा सुरशीच्या लढतीत ३८-३२ असा पराभव करून विजयी सलामी दिली. अजित चौहानच्या खोलवर चढाया आणि जयेश महाजन, अनुज गाढवेचा भक्कम बचाव यामुळे महाराष्ट्राचा विजय सुकर झाला. बिहारकडून विशाल कुमार आणि अंकित सिंगचा खेळ उल्लेखनीय ठरला. मुलांची गाठ आता राजस्थानशी पडणार आहे. मुलींच्या गटात मात्र महाराष्ट्राला हरियानाकडून २५-४१ असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला. Maharashtra leads the medal table again

४ बाय ४०० मीटर रिलेत मुलींना सुवर्ण

महाराष्ट्राच्या मुलींनी ४ बाय १०० मीटर पाठोपाठ ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीतही सुवर्ण कमाई केली. ॲथलेटिक्समध्ये महेश जाधवने लांब ऊडीत रौप्यपदकाची कमाई केली. श्रावणी देसावळेचीही उंच उडी रुपेरी यशापर्यंत गेली. ईशा जाधव, वैष्णवी कस्तुरे, रिया पाटील, अनुष्का कुंभार या महाराष्ट्राच्या मुलींच्या चमूने ३ मिनिट ५२ सेकंद वेळ देत सुवर्णुपदक कमावले. श्रावणीने १.६३ मीटर, तर महेश जाधवने ७.११ मीटर उंची उडी मारली. दोघांचे प्रयत्न त्यांना रौप्यपदकापर्यंत घेऊन गेले. ८०० मीटर शर्यतीत रिया पाटीलने २ मिनिट १२.५६ सेकंद वेळ देताना ब्रॉंझपदक मिळविले. रिया कोल्हापूरला अभिजीत म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. Maharashtra leads the medal table again

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

जिम्नॅस्टिकमध्ये सुवर्णभरारी

महाराष्ट्राच्या संयुक्ता काळेने आपल्या जबरदस्त कामगिरीने महाराष्ट्राची पदकतालिकेतील बाजू भक्कम केली. संयुक्ताने तालबद्ध जिम्नॅस्टिक प्रकारात ४ सुवर्ण, १ रौप्य अशी पाच पदकांची कमाई केली. किमयाने ३ ब्रॉंझपदके मिळविली. संयुक्ताने सुवर्णपदक पटकाविताना हूप प्रकारात २६.२५, बॉल मध्ये २६.१५, क्लबमध्ये २५.४५, रिबनमध्ये २४.५५ गुण पटकावले. तिची जोडीदार किमयाने बॉलमध्ये २२.३५, क्लबमध्ये १९.९५, रिबनमध्ये १९.६५ गुण मिळवून ब्रॉंझपदकाची कमाई केली. जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राचा दबदबा कायम राहिला असून, महाराष्ट्राने या क्रीडा प्रकारात ७ सुवर्ण, ५ रौप्य आणि ७ ब्रॉंझपदके मिळविली. जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी सर्वसाधारण विजेतेपद मिळविले, तर मुलांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. Maharashtra leads the medal table again

संयुक्ताची कामगिरी निश्चितच महाराष्ट्राचा लौकिक उंचावणारी आहे. तिची कामगिरी उल्लेखनीय ठरली. भविष्यात तिला नक्कीच या कामगिरीने प्रेरणा मिळेल आणि ती आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उंचावेल.- सुहास दिवसे, महाराष्ट्राचे क्रीडा आयुक्त

संयुक्ता गुणी खेळाडू आहे. त्यामुळेच या वयातही तिने राष्ट्रीय स्तराबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आहे. भविष्यात ती ऑलिम्पिकमध्ये निश्चितपणे नाव मिळवेल.- पूजा आणि मानसी सुर्वे, संयुक्ताच्या प्रशिक्षक

सलग दुसऱ्या वर्षी चार सुवर्णपदकांची मानकरी होताना खूप आनंद होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जिम्नॅस्टिकमध्ये भारताला अजून कुणी पदक मिळवून दिलेले नाही. मला ते करून दाखवायचे आहे आणि त्यासाठी खेलो इंडियाने मला मोठा आत्मविश्वास मिळवून दिला. – संयुक्ता काळे, महाराष्ट्राची सुवर्ण जिम्नॅस्ट Maharashtra leads the medal table again

संघाच्या कामगिरीवर निश्चित समाधानी आहे. मुलांमध्ये उत्तर प्रदेशचे नेहमीच आव्हान राहते. मुलांकडून थोड्याशा चुका झाल्या. पण, शेवटी खेळ आहे. काही पदके थोड्याफार फरकाने हुकली. संयुक्ताने तर कमाल केली. सारा राऊळने मिळविलेले यश सर्वात महत्वाचे आहे. पदार्पणाच्या स्पर्धेत ऑल राऊंड प्रकारात सुवर्णपदक ही मोठी गोष्ट आहे. या स्पर्धेचे ती फाईंड आहे असे म्हणता येईल. – महेंद्र बाभुळकर, जिम्नॅस्टिक प्रशिक्षक Maharashtra leads the medal table again

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtra leads the medal table againMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share46SendTweet29
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.