संदेश कदम, आबलोली
रत्नागिरी, ता. 20 : रेसिल इन संस्थेचे संस्थापक श्री. सुधीर पाथाडे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र उद्योग अवार्ड पुणे २०२३ सन्मान लांजातील आदिष्टि अग्रो ऑरगॅनिक प्रोड्यूसर कंपनीचे संस्थापक, अध्यक्ष अंकुश गुरव यांना प्रदान करण्यात आला. Maharashtra Industry Award to Ankush Gurav

गेली दोन ते तीन वर्षे एम.सी.एल कंपनीच्या माध्यमातून आदिष्टि अग्रो ऑरगेनिक प्रोड्यूसर कंपनीने ज्या काही सामाजिक कामांचा पर्यावरण वाचवण्यासाठी वसा घेत कुठे झाडे लावणे, तर कुठे महिला बचत गटांना रोजगार प्रशिक्षण, तसेच छोटे छोटे लघु उद्योगातुन जैविक उत्पादन तयार करण्यासाठी लघु उद्योगांमधून हात भार लावण्याचे भरीव काम करत आहेत. म्हणून लांजा तालुका सुपुत्र एम.सी.एल संलग्न एम.एस.एस श्री.अंकुश गुरव यांना व त्यांच्या कंपनीला त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल रेसेल इन संस्था पुरस्कृत सिनेतारका तेजस्वीनी पंडित यांच्या हस्ते पुणे वाकड हॉटेल टिप टॉप प्लाझा येथे सन्मान पुर्वक गौरवण्यात आले. याचे श्रेय लांजा येथील स्थानिक पत्रकार श्री रविंद्र गावडे यांचे आहे. त्यांच्या विचारामुळे व लेखनी मुळे हा मान मिळाला. Maharashtra Industry Award to Ankush Gurav

