• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 December 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम

by Mayuresh Patnakar
August 3, 2023
in Ratnagiri
60 1
0
Maharashtra first in the country in foreign investment
119
SHARES
339
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

उद्योगमंत्री सामंत, १० हजार कोटींचा  प्रकल्प रत्नागिरीत येणार

रत्नागिरी, दि. 03 : गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात १ लाख १८ हजार ४२२ कोटींची परदेशी गुंतवणूक राज्यातील उद्योगांमध्ये झाली असून, यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. एमआयडीसीच्या पुढील वर्धापन दिनापर्यंत १० हजार कोटींचा प्रकल्प रत्नागिरीत असेल, अशी अपेक्षा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. Maharashtra first in the country in foreign investment

एमआयडीसीच्या ६१ व्या वर्धापन दिन सोहळयात उद्योगमंत्री श्री. सामंत बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात १ लाख १८ हजार ४२२ कोटींची परदेशी गुंतवणूक आणू शकलो यात एमआयडीसीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. दावस येथे झालेल्या सामंजस्य करारापैकी १ लाख ६ हजार उद्योगांना जागा दिली आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना त्याबाबत धन्यवाद देतो. निश्चितच ते सत्काराला पात्र आहेत. Maharashtra first in the country in foreign investment

सर्वसामान्य माणसाला त्रास होता कामा नये, हे एमआयडीसीने जपलय. मानसिकता असेल तर काय किमया होऊ शकते, हे एमआयडीसीने दाखवून दिले आहे. स्थानिकांना प्राधान्याने काम दिलं पाहिजे, त्यांना जगवलं पाहिजे, त्या घटकाला वंचित ठेवू नये, अशी भूमिका उद्योजकांनी घेतली पाहिजे. इथून पुढेही एमआयडीसीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शांतपणे व तन्मयतेने काम करावं, असे मार्गदर्शनही उद्योगमंत्री श्री. सामंत यांनी केले. यावेळी शैक्षणिक परीक्षेत उत्तम गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले. Maharashtra first in the country in foreign investment

कार्यक्रमाची सुरुवात शिवमूर्तीच्या पुजनाने आणि दीपप्रज्ज्वलनाने झाली. प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे यांनी कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक केले. तसेच कार्यकारी अभियंता सचिन राक्षे यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी,  उपअभियंता बी.एन. पाटील, माजी जि.प. सदस्य महेश उर्फ बाबू म्हाप, माजी नगराध्यक्ष राहूल पंडित, उद्योजक संस्थेचे प्रतिनिधी के.बी. भट, राजेंद्र सावंत, दिगंबर मगदूम आदी उपस्थित होते. Maharashtra first in the country in foreign investment

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtra first in the country in foreign investmentMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share48SendTweet30
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.