आ. भास्कर जाधव; मुख्यमंत्री व अजित पवार यांच्या कार्याचे केले कौतुक
गुहागर, ता. 30 : भारताने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. या वाटचालीत सर्वांत मोठे योगदान देशातील महसुल विभागाने दिले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हे अभियान म्हणजे सन्मान आणि सहवेदनेचा एकत्रित कार्यक्रम आहे. या दोघांनी राज्याच्या विकासात दिलेले योगदान मोलाचे आहे. असे प्रतिपादन गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केले. ते महाराजस्व अभियान समाधान शिबिरात बोलत होते. Maharajswa Samadhan Camp

गुहागर विधानसभा मतदारसंघामधील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर पाटपन्हाळे येथील पूजा मंगल कार्यालय येथे आमदार भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी बोलताना आमदार जाधव म्हणाले की, अजित पवार यांनी कधीच कोणाचे काम करताना भेदभाव केला नाही. एखादे काम होणार असेल तर करतो अन्यथा होणार नाही असे स्पष्टपणे सांगण्याची ताकद अजितदादांमध्ये होती. त्याचप्रमाणे त्यांनी विकासकामांमध्ये त्यांनी कधीही पक्षीय भेदभाव केला नाही. कार्यमग्न नेता म्हणून ओळख कोणालाही विसरता येणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कर्तृत्व आणि वकृत्व आपण सर्वजण पहातोय. भविष्यात दिर्घकाळापर्यंत त्यांचे कार्य सुरू रहावे, टिकावे अशा त्यांना शुभेच्छा देतो. महाराजस्व अभियान देखील अनेक वर्ष सुरू आहे. शासनाच्या योजनांचा लाभ सुलभपणे सर्वांना मिळावा म्हणून महसुल विभागातर्फे अभियान राबविले जाते. आपण सर्वांनी सरकारी योजनांचा लाभ घेतला पाहिजे. लोकप्रतिनिधींनीही आपल्या विभागात या योजना पोहचविल्या पाहिजेत. आता शेतीही ओस पडली आहे. सर्वांनी शेती करणे सोडली आहे. नवनवीन तंत्रज्ञान खेडोपाड्यापर्यंत पोहचले आहे. एआय तंत्रज्ञानही आले आहे. अशा तंत्रज्ञानाने सर्वांची कामे आता सोपी झाली आहेत. त्यामुळे यांचा उपयोग करुन सर्वांनी नकारात्मकता काढून अशा योजनांचा उपक्रमांचा लाभ घ्यावा. Maharajswa Samadhan Camp

मच्छिमारांच्या घराखाली जमिनींचा विषय आम्ही मार्गी लावला. फळपिक योजना, नुकसानभरपाई तसेच वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान याची भरपाई आदी विषय आम्ही लावून धरल्याने शेतकऱ्यांना याचा आज फायदा होत आहे. माझ्या मतदारसंघात एकही अधिकारी बिनकामाचा नाही. जो अधिकारी येथे येतो तो काम करणाराच असतो. त्यामुळे त्याची बदली करणे अशा फंदात मी पडत नाही. जनतेची कामे त्यांच्याकडून होणे अपेक्षित असते. एवढाच आमचा हेतू असल्याचे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले. Maharajswa Samadhan Camp
यावेळी खेड उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, तहसिलदार परिक्षित पाटील, गुहागर पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, गुहागरच्या नगराध्यक्षा सौ. निता मालप, जिल्हापरिषद कृषी समिती सभापती महेश नाटेकर, जि.प. सदस्य प्रमोद गांधी, सौ. नेत्रा ठाकूर, आदी उपस्थित होते. Maharajswa Samadhan Camp
