• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 August 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर येथील समाधान शिबीराचा 3366 ग्रामस्थांना लाभ

by Manoj Bavdhankar
July 30, 2026
in Guhagar
138 2
0
Maharajswa Samadhan Camp
272
SHARES
777
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 30 : गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरात वेगवेगळ्या योजनांच्या 3366 लाभधारकांना दाखले, शासकीय योजनांचे मंजुरी पत्र देण्यात आले. यामध्ये 406 महिलांना शेतकरी दर्जा दिल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. गावठाणातील नागरिकांना स्वामित्व देण्याची सनद 44 लाभार्थ्यांना देण्यात आली. तर 2 लाभार्थ्यांचे शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमित करण्यात आले. Maharajswa Samadhan Camp

Maharajswa Samadhan Camp

गुहागरमध्ये झालेल्या समाधान शिबिरात राज्य संचालित शासकीय योजनांच्या मंजुरीचे पत्र 372 लाभार्थींना देण्यात आले. तर 257 लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभ मंजुरीचे पत्र देण्यात आले. 181 ग्रामस्थांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. तर 1151 लाभार्थ्यांना अन्य योजना, दाखले यांचे वितरण करण्यात आले. तुकडेबंदी कायद्यांच्या अंमलबाजवणीसाठी स्थानिक क्षेत्र घोषणापत्राचे 56 जणांना वितरण करण्यात आले. 632 जमीनधारकांना जीवंत सातबारा मोहीमेअंतर्गत सातबारा देण्यात आला. विधानसभा क्षेत्रातील घरकुल योजनेअंतर्गत विशेष तरतुदीचा लाभ देणारे पत्र 265 ग्रामस्थांना देण्यात आले. अशाप्रकारे 3366 ग्रामस्थांचे समाधान या शिबीरात करण्यात आले. अशी माहिती गुहागरचे तहसीलदार परिक्षित पाटील यांनी दिली. Maharajswa Samadhan Camp

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMaharajswa Samadhan CampMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share109SendTweet68
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.