समाजमंदिर ग्रामस्थ मंडळाकडून सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दि. 4 मे रोजी विविध कार्यक्रम
गुहागर, ता. 01 : मधील किर्तनवाडी गावडे विभाग, समाजमंदिर ग्रामस्थ या मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गुरुवार दि. 04 मे 2023 रोजी श्री सत्यनारायणाची महापुजा आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती समाजमंदिर ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. Mahapuja on Golden Jubilee Year at Guhagar

यानिमित्ताने गुरूवार दि. 04 मे 2023 रोजी स. 9 वा. श्री सत्यनारायणाची महापुजा व आरती, स. 11.30 वा. जेष्ठ मान्यवर सभासदांचा सन्मान सोहळा, दु. 3 ते 6 वा. महिलांचे हळदीकुंकू, सायं. 7.30 ते 9.30 वा. पर्यंत सुस्वर भजने श्री नुतन ज्ञानेश्वर प्रासादिक भजन मंडळ स्थानिक आणि मुंबई किर्तनवाडी गावडे विभाग सादर करणार आहेत. यामध्ये (बुवा श्री. विनायक पांडूरंग जोशी पखवाज – कु. यश सुरेश पानकर, तबला – श्री. अजित अर्जून भडवळकर) व (बुवा श्री. समीर सिताराम साटले व श्री. अशोक अर्जुन तानकर. पखवाज – कु. सुदेश संतोष भागडे व श्री. दिलिप तानाजी साटले.) रात्रौ 10 वा. डबलबारी भजनांचा जंगी सामना (श्री कोटेश्वर नवतरुण प्रा.भजन मंडळ, हरकुळ-बुद्रुक, जि. कणकवली बुवा श्री. अभिषेक शिरसाट, गुरुवर्य, श्री. प्रमोद हर्याण यांचे शिष्य, पखवाज -श्री. रुपेश परब, तबला – श्री. अभिषेक सुतार,) व (श्री लिंगरवळनाथ प्रा.भजन मंडळ, पोखरण ता. कुडाळ, जि. सिंधुदूर्ग, बुवा श्री. समीर कदम गुरुवर्य, कै. काशिराम परब बुवा श्री. सुशील गोठणकर बुवा यांचे शिष्य, पखवाज – कु. ओंकार दुखंडे, तबला – कु. साहील गुरव ) यांच्यामध्ये होणार आहे. Mahapuja on Golden Jubilee Year at Guhagar
शुक्रवार दि. 5 मे 2023 रोजी सकाळी 9 वा. महापुजा विसर्जन, रात्रौ 10 वा. श्री नुतन ज्ञानेश्वर सांस्कृतिक कलामंच किर्तनवाडी गावडे विभाग आयोजित नृत्याविष्कार सादर केले जाणार आहेत. तरी सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज मंदिर ग्रामस्थ मंडळ किर्तनवाडी (गावडे विभाग) गुहागर यांनी केले आहे. Mahapuja on Golden Jubilee Year at Guhagar
