गुहागर, ता. 03 : नालासोपारा येथील साईभूमी चाळ रहिवाशी संघ, कोकण नगर, वालई पाडा, संतोष भुवन येथे प्रतिवर्षी प्रमाणे श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रविवार दि. 12 फेब्रुवारी 2023 रोजी या आनंदी सोहळ्यास सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळीसह उपस्थित राहून तिर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती सोसायटीच्या वतीने करण्यात आली आहे. Mahapuja of Saibhumi Chal Sangh
या श्री सत्यनारायण महापुजेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक मा.श्री. सचिनदादा देसाई उपस्थित राहणार आहेत. तरी सकाळी 9 वा. श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी 2 वा. विविध स्पर्धा, सायं. 4 वा. महिला हळदीकुंकू समारंभ, सायं. 6 वा. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व बक्षीस समारंभ, रात्री. 9 वा. सुसंगीत सुस्वर भजन स्पर्धा घेण्यात येणार आहे. या भजन स्पर्धेमध्ये साईदीप चाळ, साईलक्ष्मी चाळ, सदगुरू समर्थ चाळ, साईभूमी चाळ यांनी सहभाग घेतला आहे. वरील सर्व कार्यक्रम चंद्रकांत हातिम, संतोष किर्वे, राजन किणी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे. Mahapuja of Saibhumi Chal Sangh
तरी श्री सत्यनारायण महापुजेसाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष विनोद शितप, सचिव अरविंद डावल, खजिनदार समिर धावडे कार्याध्यक्ष दिलीप जोशी, उपाध्यक्ष विलास पाष्टे, उपसचिव रामकृष्ण खाडे, उप खजिनदार विनोद पाष्टे, सल्लागार दशरथ गोठणकर, सदस्य रुपेश गावडे, सदस्य नथुराम घाटकर, सदस्य शैलेश डिंगणकर, सदस्या सुनीता परब निमंत्रक साईभूमी चाळ सभासद आणि महिला मंडळ यांनी केले आहे. Mahapuja of Saibhumi Chal Sangh

