संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 12 : तालुक्यातील आबलोली येथील निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथे विश्वभूषण, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८ वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच सौ. वैष्णवी नेटके, ग्रामविकास अधिकारी बाबूराव सुर्यवंशी आणि मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. Mahaparinirvana day at Aabloli
त्यानंतर ग्रामविकास अधिकारी बाबूराव सुर्यवंशी यांनी विश्वभूषण,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन कार्यावर मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच सौ. वैष्णवी नेटके, ग्रामविकास अधिकारी बाबूराव सुर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्या श्रीमती. नम्रता निमूणकर, सौ. पायल गोणबरे, सौ.रुपाली कदम, सौ. शैला पालशेतकर, सदस्य संजय कदम, अंगणवाडी सेविका सौ.सुनिता पवार, सौ.रिया रेपाळ, सौ.प्रिया कदम, आशा सेविका सौ. विशाखा कदम, सौ.सानिद्या रेपाळ, सामाजिक कार्यकर्ते विजय वैद्य, संदेश काजरोळकर, पत्रकार अमोल पवार, पत्रकार संदेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते. Mahaparinirvana day at Aabloli