मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंचच्या वतीने आयोजन
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 09 : चिपळूण तालुक्यात गेली २८ वर्ष विविध क्षेत्रात कार्यरत असलेली मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत या कौटुंबिक संस्थेच्या वतीने विश्वशांती सामूहिक महा बुद्धपूजा पठन संस्कार समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला. अशोका विजया दशमीचे औचित्य साधून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने विशेषतः अश्विनी पौर्णिमेच्या वर्षावास समाप्ती समारोहाच्या निमित्ताने हा सोहळा तक्षशिला बुद्ध विहार, खेरशेत येथे आयोजित केलेला हा आगळावेगळा संस्कार समारंभ ज्येष्ठ श्रेष्ठ धम्मचारी, श्रामणेर भन्ते, उपासक, उपासिका आणि ग्रामस्थांच्या समवेत पूर्णतः धम्ममय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. Maha Buddha Puja reading at Khershet
आज विश्वातल्या विनाशाला कारणीभूत असलेल्या विविध भीषण समस्यांमुळे पृथ्वीचा अंत जवळ येऊन ठेपला आहे. सर्वसामान्य लोकांच्या मनात भय, असुरक्षितता, चिंता, दुःख, वेदना यांचे थैमान माजले आहे. वास्तविक लोकांच्या मानसिकतेत, व्यवहारात आणि विचार प्रक्रियेत आमूलाग्र बदल घडवून आणल्याशिवाय जग हे दुःख (विनाश) मुक्त होऊ शकत नाही. याकरिता सब्बे सत्ता सुखी होन्तु किंवा भवतु सब्ब मंगलम् अथवा बहुजन हिताय, बहुजन सुखाय या भगवान बुद्धांच्या महासुक्ताची आज नितांत गरज आहे. भगवान बुद्धांच्या धम्मनीती मार्गाने शरण जाऊन विश्वशांती, मानव कल्याणाची, समस्त प्राणी मात्र सुखी होवो अशी भावना व्यक्त करण्याकरिता आश्विनी पौर्णिमेच्या वर्षावास समाप्ती समारोहाच्या निमित्ताने चिपळूण तालुक्यातील खेरशेत येथील तक्षशिला बुद्ध विहारामध्ये मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच या कौटुंबिक सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने तसेच चिपळूण तालुका हितसंरक्षक समिती गावशाखा: खेरशेत आणि धम्मभूषण विकास संघ, खेरशेत (मुंबई )रजि. यशोधरा महिला मंडळ, खेरशेत व सम्यक युवा मंच, खेरशेत या संघटनेच्या सहकार्याने विश्वशांती सामूहिक महा बुद्धपूजा पठन संस्कार समारंभ २०२३ स्थानिक संघटनेचे अध्यक्ष सुनील शंकर कदम, यांच्या अध्यक्षतेखाली आणि धम्मचारी जीनरुची यांच्या अधिपत्याखाली हा संस्कार समारंभ सोहळा संपन्न झाला. Maha Buddha Puja reading at Khershet
या संस्कार समारंभापूर्वी खेरशेत गावचे सर्वेसर्वा सन्मा. काशिराम कदम गुरुजी आणि हडकणी येथील वयोवृद्ध धम्म अनुयायी सन्मा. गोविंद पर्शूराम आंबेटकर गुरुजी यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण करण्यात आला. नंतर भगवान बुद्धांच्या बुद्ध रूपाला पुष्प अर्पण तसेच डॉ . बाबासाहेब आंबेडकर, माता रमाबाई आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमांना पुष्प माळा अर्पण करून अगरबत्ती, दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी धम्मविचार पीठावर संस्थाध्यक्ष सुनील शंकर कदम, धम्मचारी जीनरुची (प्रा.के.एस .सावरे सर ,डी.बी.जे कॉलेज, चिपळूण) श्रामणेर भन्ते धम्मप्रिय (सन्मा.रमेश वाघमारे, माजी सैनिक आणि मेजर जनरल, समता सैनिक दल, मुंबई), श्रामणेर भन्ते शिवली (सन्मा.शरद कदम, माजी अध्यक्ष खेरशेत(मुंबई), जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते काशिराम कदम गुरुजी (खेरशेत), जेष्ठ धम्मअनुयायी गोविंद पर्शूराम आंबेटकर गुरुजी (हडकणी), सौ.सरिता पवार (माजी सरपंच, ग्रामपंचायत खांडोत्री ) सामाजिक कार्यकर्ते सुरेश जाधव (पाटण), सन्मा. सुनील गोतपागर (निवृत्त इंजिनिअर, दूरदर्शन, मुंबई), माजी सैनिक शांताराम सावंत (कोसबी), सन्मा. सुरेश सावंत बुवा (चिपळूण, पागझरी) आणि सामाजिक कार्यकर्ते सन्मा.संजय शांताराम कदम (मुख्य प्रवर्तक, मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच) आदी उपस्थित होते. Maha Buddha Puja reading at Khershet
उपस्थितांना शुभ्रवर्णित पुष्प , धम्मध्वज (पंचशील) पट्टीका धम्म देऊन सन्मानित करण्यात आले. या धार्मिक संस्काराचे सूत्रसंचालन खेरशेत गावचे सुपुत्र श्रामणेर भन्ते शिवली (सन्मा.शरद कदम, माजी अध्यक्ष,मुंबई) यांनी केले. तर नियोजित समारंभाची प्रस्तावना अँड.प्रशितोष कदम (माजी अध्यक्ष, सम्यक युवा मंच, खेरशेत) यांनी केली. प्रस्तावनेनंतर संस्कार समारंभाची सुरुवात धम्मचारी जीनरुची यांच्या मार्गदर्शनाखाली आनापान सतीच्या माध्यमातून करण्यात आली. त्यांनी प्रथमतः आनापान सतीचे महत्व विषद करुन त्रिशरण , पंचशील, बुद्धपूजा, बुद्ध धम्म संघ वंदना, करणीय मेत्त सुत्त आणि पुण्यानुमोदनाने सामूहिक बुद्धपूजा पठन संपन्न झाल्या नंतर ‘चक्रमण’ अर्थात वर्षावासातील ध्यानस्थ भिक्खूसम धीरगंभीरतेने मंद पावलाने सब्बे सत्ता सुखी होन्तु हे धम्मसूत्त म्हणत तक्षशिला बुद्ध विहारात पाच वेळा गोलाकार स्थितीत परिक्रमण करण्यात आले. या नंतर संस्कार समारंभाला मंगलमैत्री पूर्ण भावनेने समर्पित झालेल्या सर्व उपस्थित बौद्धाचार्य, धम्ममित्र, धम्मचारी, श्रामणेर आणि धम्म बंधू भगिनीनी, ग्रामस्थांना कृतज्ञतापूर्वक मान्यवरांच्या हस्ते, धम्म ध्वज (पंचशील) पट्टीका व आकर्षक स्वरूपातील सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. Maha Buddha Puja reading at Khershet
सदर समारंभाचे सूत्रसंचालन खेरशेत गावची सुकन्या सौ. राजक्रांती कदम -तांबे(मिरजोळी, चिपळूण) यांनी केले. मुंबई ते चिपळूण येथून आलेल्या सर्व उपस्थितीत साधकांचे आभार मानण्यात आले. या संस्कार समारंभा नंतर उपस्थितांना भिक्षूणी सुजाताची खीरदान करण्यात आली. सदर संस्कार समारंभ यशस्वी करण्याकरिता मुंबई, स्थानिक संघटना आणि महिला मंडळाचे सर्व कार्यकारी पदाधिकारी, सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. Maha Buddha Puja reading at Khershet