गुहागर, ता. 12 : तालुक्यातील वेलदूर खोंडावाडी येथे माघी श्रीगणेशोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. हा सोहळा दि. 13 व 14 फेब्रुवारी रोजी हे दोन दिवस साजरा होणार आहे. तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. Maghi Ganeshotsav at Veldur

माघी श्रीगणेशोत्सव सोहळानिमित्त मंगळवार दिनांक 13 रोजी सकाळी 9.30 वा. प्राणप्रतिष्ठा, 10 ते 11.30 वा. किर्तनकार ह.भ.प.सौ. मनाली मनोज बावधनकर यांचे किर्तन, दुपारी 12.30 वा. जन्मकाळ, दुपारी 1 ते 2 वा. महाप्रसाद, सायं. 6 वा. रथ मिरवणूक, रात्रौ 8 वा. महाआरती. बुधवार दिनांक 14 रोजी सकाळी 9.30 वा. श्री सत्यनारायण पूजा, दुपारी 1. ते 2 वा. महाप्रसाद. रात्रौ 8 वा. महाआरती. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन वेलदूर खोंडावाडी ग्रामस्थ व महिला मंडळ यांचेकडून केले आहे. Maghi Ganeshotsav at Veldur
