गुहागर, ता 29 : तालुक्यातील श्री देव गणपती फंड, देवपाट येथे दि. 31 जानेवारी ते 02 फेब्रुवारी 2025 रोजी माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गुरुवार दि. 13 /02 /2025 रोजी गजानन नाट्य समाज, देवपाट निर्मित कवडीचुंबक हे विनोदी नाटक रंगमंदिर गुहागर येथे सादर करण्यात येणार आहे. तरी सर्व कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देव गणपती फंड, देवपाट यांनी केले आहे. Maghi Ganesh Festival at Guhagar
शुक्रवार दि. 31 रोजी सकाळी 7 वाजता श्रीं ची षोडशोपचार पुजा, सकाळी 8 वाजता सहस्त्रावर्तन व आरती, सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत महिलांसाठी हळदी-कुंकू, रात्री 10 वा. ह.भ.प सौ. नम्रता व्यास – निमकर (पुणे)यांचे कीर्तन. शनिवार, दि. 01 रोजी सकाळी ७ वा. श्रीं ची षोडशोपचार पुजा, सायं. ५ ते ७ महिलांचे अथर्वशीर्ष पठण, रात्री 10 वा. ह.भ.प. नम्रता व्यास – निमकर, यांचे किर्तन. रविवार, दि. 02 रोजी सकाळी 7 वाजता श्रीं ची षोडशोपचार पुजा, रात्री 9 वा. सुरभी भजन मंडळ, खालचापाट, गुहागर यांचे भजन, रात्री 10 वाजता श्री गोपाळकृष्ण आरती मंडळ, खालचापाट यांची महाआरती व मंत्रपुष्पांजली होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देव गणपती फंड, देवपाट यांनी केले आहे. Maghi Ganesh Festival at Guhagar