“इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये गौरविलेले” चलत चित्र रांगोळी प्रदर्शन
गुहागर, ता 21 : तालुक्यातील श्री देव गणपती ( उफराटा) फंड, देवपाट येथे दि. 24 ते 26 जानेवारी 2023 रोजी माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी विविध संगीत आणि सामाजिक नाट्य प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. तसेच गत स्मृतींना उजाळा देण्याच्या हेतूने एक स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. Maghi Ganesh Festival at Guhagar
गेली १०० वर्षे श्री देव गणपती फंड गुहागर यांचे वतीने श्री गजानन नाट्य समाज, विविध संगीत आणि सामाजिक नाट्य प्रयोग प्रतिवर्षी सादर करतात. त्याचप्रमाणे या वर्षीही या गणेशोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Maghi Ganesh Festival at Guhagar


मंगळवर दि. 24 रोजी सकाळी 7 वाजता श्रीं षोडोपचार पुजा, 8 वा वाजता -सहस्त्रावर्तन व आरती, सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत महिलांसाठी हळदी-कुंकू, रात्री १० वा.ह.भ.प चिंतामणी निमकर (पुणे)यांचे कीर्तन. बुधवार, दि. २५ रोजी सकाळी ७ वा.श्रीं षोडोपचार पुजा, सकाळी ८ वा. श्री सत्यनारायण महापूजा, सायं. ५ ते ७ महिलांचे अथर्वशीर्ष पठण, रात्री ९ वा. महाअआरती, रात्री १० वा.ह.भ.प. चिंतामणी निमकर, यांचे किर्तन. गुरुवार, दि. 26 रोजी रात्री ९.३० वा.श्री गजानन नाट्य समाज स्मरणिका प्रकाशन. Maghi Ganesh Festival at Guhagar
हे प्रकाशन उद्योजक व गणेशभक्त श्री. श्रीराम खरे, उद्योजक, श्री. अमर पेठे,पेठे ब्रेक मोटर्स, मोडकागर, श्री. समीर काळे, मॅगो व्हिलेज, गुहागर, श्री. किरण खरे,अध्यक्ष, श्री.दुर्गादेवी देवस्थान,गुहागर. श्री.शार्दुल भावे,अध्यक्ष, श्री. व्याडेश्वर देवस्शान, गुहागर यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहेत. या वेळी श्री गजानन नाट्य समाज, गुहागर या संस्थेत योगदान दिल्याबद्दल सत्कार डॉ.वसंत ओक, श्री. अशोक आठवले, श्री. अरूण परचुरे, श्री.उदय सावरकर, श्री.अविनाश आगाशे यांचा सत्कार होणार आहे. तर रात्री १० वा.अविनाश आगाशे (मुंबई) यांचे संगीत सेवा कार्यक्रम आहे. Maghi Ganesh Festival at Guhagar
शुक्रवार, दि. 27 रोजी रात्री 9.30 वा. श्री गजानन नाट्य समाज देवपाट शतकपूर्ती सोहळा संपन्न होणार आहे. या शतकपूर्ती सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शन म्हणून श्री. रविंद्र खरे,दिग्दर्शक / विश्र्वस्त, भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे, श्री. पं. मुकुंद मराठे, जेष्ट संगीत नाट्यकलाकार, श्री. ज्ञानेश पेंढारकर, ललितकलादर्श, मुंबई यांची उपस्थिती लाभणार आहे. रात्री 10 वा. रंग मंदिर गुहागर येथे संगीत संत कान्होपात्रा. लेखक ना. वी.कुलकर्णी, दिग्दर्शक विवेक जोशी, संगीत मार्गदर्शन राजाभाऊ शेंबेकर करणार आहेत. रविवार, दि. २९ रोजी रात्री 9.30 वा.श्री गजानन नाट्य समाज देवपाट शतकपूर्ती सोहळा. या शतकपूर्ती सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शन म्हणून तहसिलदार सौ.प्रतिभा वराळे, नगराध्यक्ष, श्री. राजेश बेंडल यांची उपस्थिती लाभणार आहे. रात्री १० वा. रंगमंदीर गुहागर येथे दिग्दर्शक, श्री. उदय सावरकर व लेखक,वसंत सबनीस यांचे सामाजिक नाटक ‘अप्पाजींची सेक्रेटरी’ सादर करण्यात येणार आहे. Maghi Ganesh Festival at Guhagar
तसेच गुहागर मध्ये प्रथमच दि. २४ ते २७ जानेवारी २०२३ रोजी श्री. संतोष केतकर, चिपळूण यांचेकडून “इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये गौरविलेले” चलत चित्र रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. तरी या सर्व कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देव गणपती ( उफराटा) फंड, देवपाट यांनी केले आहे. Maghi Ganesh Festival at Guhagar